माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेता मुलाच्या उपचारासाठी मागतोय मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:53 PM2021-04-19T16:53:49+5:302021-04-19T16:55:21+5:30
या आजारामुळे त्याच्या मुलाला मान पकडता येत नाही. हा आजार असलेला भारतातील तो एकमेव रुग्ण असून जगातला 23 वा रुग्ण आहे.
अभिनेता अतुल विरकरने माझ्या नवऱ्याची बायको, तू माझा सांगाती, लव्ह लग्न लोचा यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत झळकला होता. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात त्याला काम मिळण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले असून त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यात त्याच्या मुलाला एक दुर्दम्य आजार असल्याने त्याच्या उपचाराचा खर्च त्याला परवडत नाहीये. त्यामुळे त्याने लोकांकडे मदतीचे आवाहन केले आहे.
अतुल ठाण्यातील वर्तक नगर परिसरात राहात असून त्याचा मुलगा प्रियांशला एक महिन्याचा असताना फिट आली होती. तेव्हापासून त्याला बॅलेन्स नाहीये. त्याला डेव्हलपमेंट डिले डिसऑर्डर हा आजार असल्याचे त्यावेळी निदान झाले. त्यामुळे त्याला त्याची मान पकडता येत नाही. त्याने गेल्या वर्षभरात तीन लाख रुपये तरी खर्च केला आहे. हा आजार असलेला भारतातील तो एकमेव रुग्ण असून जगातला 23 वा रुग्ण आहे. त्याच्या उपचारासाठी आठ ते दहा लाख रुपयांची गरज असून त्याने लोकांकडे मदत मागितली आहे.
Namaskar mitranno aaple mitra Atul Virkar hyancha mulga priyansh eka rare aajarala samora jatoy...sarvanna vinanti aahe ki ekda hi post vacha aani jamlyas Atul virkar hyanna madaticha haath dya🙏
Posted by Varad Vijay Chawan on Saturday, April 17, 2021
अभिनेता वरद चव्हाणने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत अतुलच्या मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याविषयी लोकांना आवाहन केले आहे. वरदने शेअर केलेल्या या व्हिओसोबतच त्याने काही स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. त्यात अतुलच्या मुलाची ट्रीटमेंट सध्या सुरू असून येत्या 6 महिन्यांचा खर्च 50 हजार रुपये असणार असल्याचे त्यात लिहिण्यात आले आहे.
तसेच अभिनेता ज्ञानेश वाडकर, दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी देखील सोशल मीडियाद्वारे त्याच्या मुलाला मदत करण्याविषयी लोकांना आवाहन केले आहे.
या जगातली सगळी दुःख दूर व्हावीत या करीत आपण प्रयत्न किंवा प्रार्थना तर नक्कीच करीत असतो. त्याचाच भाग, मी आज तुम्हा...
Posted by Kishor Pandurang 'Belekar' on Sunday, April 11, 2021