‘हायवे’वर कलाकारच झाले दिग्दर्शक

By Admin | Published: August 23, 2015 03:54 AM2015-08-23T03:54:51+5:302015-08-23T03:54:51+5:30

चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना दिग्दर्शकाची अगदी लगीनघाई उडालेली असते. ‘अ‍ॅक्शन- कट’असा पुकारा होत असतो. मात्र, शूटिंगच्या वेळी दिग्दर्शकच उपस्थित नसेल, तर कलाकारांनाच

The actor became the artist on 'Highway' | ‘हायवे’वर कलाकारच झाले दिग्दर्शक

‘हायवे’वर कलाकारच झाले दिग्दर्शक

googlenewsNext

चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना दिग्दर्शकाची अगदी लगीनघाई उडालेली असते. ‘अ‍ॅक्शन- कट’असा पुकारा होत असतो. मात्र, शूटिंगच्या वेळी दिग्दर्शकच उपस्थित नसेल, तर कलाकारांनाच या सूचना द्याव्या लागत असतील तर.... ‘हायवे- एक सेल्फी आरपार’ चित्रपटाबाबत अगदी असेच घडले आणि खुद्द दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यानेच हा गौप्यस्फोट केला.
उमेशने सांगितले, की शूटिंगच्या वेळी मला अनेकदा अनुपस्थित राहावे लागाचये. कारण शूटिंग सुरू असायचे तेथे माझ्या उपस्थितीसाठी जागाच नसायची. कारण रस्त्यावर प्रत्यक्ष वाहनाचा प्रवास सुरू असताना हे शूटिंग सुरू असायचे. त्यामुळे सीन सुरू करण्यापूर्वी अ‍ॅक्शन आणि कट हे कलाकारांना स्वत:च म्हणावे लागे. इतकेच नव्हे, तर त्यांनाच कॅमेरा चालू बंद करावा लागे. ‘आरभाट कलाकृती’ आणि ‘खरपूस फिल्म्स’कृत ‘हायवे- एक सेल्फी आरपार’ चित्रपटाच्या टीमने या सगळ्या गमती-जमती ‘लोकमत’ला दिलेल्या भेटीत सांगितल्या. सगळ्या टीमलाच शूटिंगच्या वेळी वेगळीच परेड करावी लागली. धावत्या हमरस्त्यावरील हे चित्रीकरण म्हणजे एक सर्कस होती. चित्रपटनिर्मितीचा प्रत्येक वेळी वेगला अनुभव देणाऱ्या या द्वयींसाठी मात्र हा अनुभव एकदमच भन्नाट होता. प्रत्यक्ष चित्रीकरण करताना दिग्दर्शक त्या वाहनांमध्ये नसूनही उपस्थित असल्याचा आभास होत होता.
उमेश कुलकर्णी सांगतात, चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण रस्ते - हमरस्ते यांवर करण्याचे ठरले होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर विना अडथळा चित्रीकरण करण्याचे पक्के झाल्यानंतर जी वाहने निघतात आणि त्यातून ज्या व्यक्तिरेखा प्रवास करतात त्यांच्या सोबत कोणत्याही तंत्रज्ञाला त्या वाहनातून प्रवास करणे शक्य नसल्यामुळे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करूनच सगळी आखणी केली होती. पण तरीही चित्रीकरणादरम्यान नेमके काय होणार, याची धाकधूक सर्वांना होतीच. पण, जेव्हा सर्व 'रॉ फुटेज' पाहिले तेव्हा सर्वांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. मात्र, मुंबई-पुणे हायवेवर विनाअडथळा चित्रीकरणाची ग्वाही देणारे आमचे निर्माते विनय गानू आणि ती पूर्णत्वास नेणारे कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांच्यासह चित्रपटासाठी प्रत्येकानेच विशेष योगदान दिले असल्याचे उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.
अभिनेते श्रीराम यादव यांनी सांगितले, की शूटिंगच्या वेळी मांडीवर कॅमेरा असायचा. त्यामुळे मला इकडे-तिकडे हलणेही अशक्य व्हायचे; कारण फ्रेम बदलण्याची भीती असायची.
नागराज मंजुळे म्हणतात, मी ट्रक ड्रायव्हर साकारला आहे. अनेकदा घरूनच त्या वेशात जायचो. त्यामुळे अनेकदा गमती व्हायच्या. कलावंतांसोबतच चित्रपटाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी आणि साउंड डिझायनर अंथोनी रुबेन यांचे विशेष कौतुक करायला हवेच. कारमध्ये प्रवाशांच्या पायाजवळ स्वत:ला वेडंवाकडं करून, तसेच रेकॉर्डिस्टने साउंड रेकॉर्डिंगसाठी चक्क बंद डिकीत झोपून कलावंतांसोबत कसलीही पर्वा न करता काम केले आहे.

Web Title: The actor became the artist on 'Highway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.