अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांना झाला कोरोना; लीलावतीमध्ये केले अ‍ॅडमिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 06:56 PM2020-08-16T18:56:51+5:302020-08-16T19:05:25+5:30

अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन लहान भाऊ एहसान खान आणि असलम खान यांना कोरोना झाल्याचे सुत्रांकडून समजतेय.

Actor Dilip Kumar had two younger brothers named Corona; Admitted in Lilavati ... | अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांना झाला कोरोना; लीलावतीमध्ये केले अ‍ॅडमिट...

अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांना झाला कोरोना; लीलावतीमध्ये केले अ‍ॅडमिट...

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन लहान भाऊ एहसान खान आणि असलम खान यांना कोरोना झाल्याचे सुत्रांकडून समजतेय. त्या दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या कारणावरून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आल्याचे कळतेय. 

 दिलीप कुमार यांचे हे दोघेही लहान भाऊ असून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागताच डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट होण्याबाबत सांगितले. त्यांचे कोरोनाचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही भावांचे वय हे ९० वर्षांपर्यंत आहे. गत शनिवारी त्या दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी मुंबईचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. नितिन गोखले यांना संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांच्यात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे सांगितले. त्यांना पहिल्यापासूनच अतिरक्तदाबाची समस्या असल्याने त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. या दोघांचा इलाज जलील पारकर हे करत आहेत. 

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, असलम आणि एहसान यांची तब्येत फार काही चांगली नाही. ते ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीयेत. त्यांना खोकला आणि ताप असल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी सांगितले, ‘ते दोघे लवकरच बरे होऊन घरी येतील, कुणीही काळजी करू नये. त्यांचा उपचार डॉ.जलील पारकर आणि डॉ.निखील गोखले हे दोघे करत आहेत. हे दोघे तज्ञ डॉक्टर आहेत. 

Web Title: Actor Dilip Kumar had two younger brothers named Corona; Admitted in Lilavati ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.