Panchayat 2: ‘पंचायत 2’साठी जीतू भैय्यानं किती मानधन घेतलं माहितीये? आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 10:39 AM2022-05-25T10:39:48+5:302022-05-25T12:30:20+5:30
Jitendra Kumar Fees For Panchayat 2: जीतू भैय्या या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. हे एकच नाव पुरेसं आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता जितेन्द्र कुमार याच्याबद्दल.
Jitendra Kumar Fees For Panchayat 2: जीतू भैय्या या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. हे एकच नाव पुरेसं आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता जितेन्द्र कुमार (Jitendra Kumar) याच्याबद्दल. आयआयटी खडकपूरमधून इंजिनिअर झालेल्या जितेन्द्र कुमारने अभिनयाच्या ध्यासानं कलाक्षेत्रात यायचं ठरवलं आणि मग तो इथेच रमला. ‘कोटा फॅक्टरी’मधून त्याने अभिनयाची सुरूवात केली. या सीरिजमध्ये त्याने जीतू भैय्याची भूमिका साकारली होती. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातील त्याची भूमिकाही गाजली. सध्या जीतू भैय्याची ‘पंचायत 2’ (Panchayat 2) ही वेबसीरिज धुमाकूळ घालतेय.
अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच ही सीरिज रिलीज झाली आणि रिलीज होताच, या सीरिजची चर्चा सुरु झाली. या सीरिजमध्ये जितेन्द्र कुमारने फुलेरा पंचायत सचिव असलेल्या अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. जितेन्द्रने हे कॅरेक्टर अफलातून रंगवलं आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक होतंय. या सीरिजसाठी जितेन्द्रने किती मानधन घेतलं माहितीये?
रिपोर्टनुसार, ‘पंचायत 2’च्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याने 50 हजार रूपये मानधन घेतलं. या सीरिजचे आठ एपिसोड आहेत. त्यानुसार, या सीरिजमधून त्याने एकूण 4 लाखांची कमाई केली आहे.
इतकी आहे नेटवर्थ
रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये जितेन्द्र कुमारची नेटवर्थ 7 कोटी रूपये होती. 2022 मध्येही त्याची नेटवर्थ 7 कोटी असल्याचं सांगितलं जातंय.
‘पंचायत’ ही हिंदी-भाषेतील कॉमेडी-ड्रामा वेबसिरीज आहे. व्हायरल फीव्हरची निर्मिती असलेल्या या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, विश्वपती सरकार आणि चंदन रॉय यांच्या भूमिका आहेत. ही सीरिज एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची गोष्ट आहे. जो उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम गावात पंचायत सचिव म्हणून दाखल होतो. या मालिकेचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील खºया पंचायत कार्यालयात झालं आहे.