'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:50 PM2024-06-14T12:50:05+5:302024-06-14T12:51:04+5:30

सुशांतसिंह राजपूतसाठी आजही चाहते, कलाकार न्याय मागत आहेत.

actor Mahesh Shetty says justice for sushant asks questions about how much long wait | 'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न

'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न

अभिनेता सुशांतसिंह राजपूत  (Sushantsingh Rajput) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. त्याला जाऊन आज 4 वर्ष झाली. 14 जून 2020 रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर अख्खी इंडस्ट्री हादरुन गेली होती. सुशांतसाठी आजही त्याचे कुटुंबीय, चाहते न्याय मागत आहेत. सुशांतचा जवळचा मित्र अभिनेता महेश शेट्टीने (Mahesh Shetty) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या का केली? त्याला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले होते का? त्याची हत्या झाली का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत होतं पण काहीच पुरावे हाती न लागल्याने केस क्लोज झाली. अभिनेता महेश शेट्टीने मित्राच्या आठवणीत लिहिले,"अजून किती काळ? आणखी एक वर्ष सरलं. असं म्हणतात गोष्टींना वेळ दिला की सगळं ठीक होतं. पण सततचे प्रश्न या गोष्टी अजून कठीण करत आहे. मी वाट बघतोय, कायद्यावर विश्वास ठेवतोय पण मला सर्वकाही जाणून घेण्याचा हक्क आहे. आम्हाला सगळं काही जाऊन घेण्याचा हक्क आहे. #JusticeForSushant"

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या हे आजही एक गूढच आहे. कोरोना काळात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र त्याने असं का केलं यासंदर्भात अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. त्याचं कुटुंब, मित्रपरिवार, चाहते न्याय मागत आहेत. मात्र सत्य अद्याप बाहेर आलेलं नाही. ते कधी येईल याचीही कोणालाच कल्पना नाही. एक उत्कृष्ट अभिनेता आणि अतिशय हुशार माणूस म्हणून सुशांत सगळ्यांच्याच मनात कायम राहील.

Web Title: actor Mahesh Shetty says justice for sushant asks questions about how much long wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.