'मी कायदेशीर कारवाई करणार...', पाकिस्तानवर चांगलेच संतापले अभिनेता नसीरुद्दीन शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:43 AM2024-02-29T10:43:37+5:302024-02-29T10:44:22+5:30
नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. 1975 मध्ये 'निशांत' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नसीरुद्दीन शाह हे नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
नसीरुद्दीन शाह यांच्या पुस्तकांची पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर विक्री होत आहे. यावर त्यांनी एक एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहलं, 'अँड देन वन डे' या माझ्या पुस्तकाचं बेकायदेशीरपणे उर्दू भाषांतर करुन त्याची पाकिस्तानमध्ये व्रिकी होत असल्याचे समोर आले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा या अनुवादाशी काहीही संबंध नाही आणि मी त्याची विक्री थांबवण्यासाठी कायदेशीर कारवाई करू इच्छितो. मी तिथल्या माझ्या मित्रांना विनंती करतो की हे पुस्तक विकत घेणे टाळावे'.
नसीरुद्दीन शाहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचा 'कुत्ते'मध्ये दिसला होता. या चित्रपटात तब्बू, अर्जुन कपूर, राधिका मदन, कोंकणा सेन शर्मा आणि कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर लवकरच ते वेबसिरीज 'शोटाइम' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही सीरिज येत्या 8 मार्चपासून डिस्ने + हॉटस्टार चाहत्यांना पाहाता येईल. यात इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन आणि विशाल वशिष्ठ यांच्याही भूमिका आहेत.