'स्टार किड्स असल्यामुळे त्यांचा मार्ग..'; मराठी कलाविश्वातील घराणेशाहीवर श्रेयसचं बेधडक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 06:30 PM2024-02-21T18:30:52+5:302024-02-21T18:31:31+5:30

Shreyas talpade: सध्याच्या काळात कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा सातत्याने चर्चिला जात आहे. अनेक कलाकारांनी यावर भाष्य सुद्धा केलं आहे. यामध्येच आता श्रेयसला घराणेशाहीचा अनुभव नेमका कसा आला ते त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

actor-shreyas-talpade-talk-about-nepotism-in-bollywood-and-marathi-industry | 'स्टार किड्स असल्यामुळे त्यांचा मार्ग..'; मराठी कलाविश्वातील घराणेशाहीवर श्रेयसचं बेधडक वक्तव्य

'स्टार किड्स असल्यामुळे त्यांचा मार्ग..'; मराठी कलाविश्वातील घराणेशाहीवर श्रेयसचं बेधडक वक्तव्य

मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (shreyas talpade). उत्तम अभिनयशैली आणि दमदार पर्सनालिटी यांच्या जोरावर श्रेयसने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गॉड फादरशिवाय त्याने स्वत:ला या झगमगत्या दुनियेत सिद्ध करुन दाखवलं. अलिकडेच श्रेयसने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने  पहिल्यांदाच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. सोबतच या दोन्ही इंडस्ट्रीतील फरकदेखील सांगितला आहे.

नेपोटिझमविषयी नेमकं काय म्हणाला श्रेयस?

आपण ज्यांना स्टार किड्स म्हणतो त्यांच्यासाठी काही गोष्टी नक्कीच सोप्या असतात. हिंदीमध्ये तर त्याची काही जिवंत उदाहरणं आहेत. मराठीमध्ये त्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे. पण स्टार किड्स असल्यामुळे त्यांचा चित्रपटांमध्ये येण्याचा मार्ग नक्कीच सोप्पा असतो. त्यांच्यासाठी एंट्री पॉइंट सोप्पा असतो. मुळात स्टार किड्स असो अथवा नसो, त्याला केवढा मोठा करायचा हे प्रेक्षकचं ठरवत असतात. त्यामुळे मला या गोष्टींचा कधीच राग नाही आला किंवा मी त्याचा एवढा विचारही करत नाही. कारण मी त्यावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल,” असं श्रेयस यावेळी म्हणाला.

दरम्यान, अलिकडेच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या दुखण्यावर मात करुन तो पुन्हा कामावर रुजूदेखील झाला आहे. श्रेयसने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात 'ओम शांती ओम', 'हाऊसफुल्ल २', 'इक्बाल' या सिनेमांचा समावेश आहे. लवकरच श्रेयस  'ही अनोखी गाठ' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होणार असून महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगवले त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
 

Web Title: actor-shreyas-talpade-talk-about-nepotism-in-bollywood-and-marathi-industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.