अभिनेत्री सोनम कपूरने केला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 09:13 AM2018-06-25T09:13:16+5:302018-06-25T09:13:37+5:30
सोनम कपूर सध्या तिचा पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये मौजमस्ती करतेय. त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनम व आनंदच्या लग्नाला उणापुरा दीड महिना होतोय.
मुंबई : सोनम कपूर सध्या तिचा पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये मौजमस्ती करतेय. त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनम व आनंदच्या लग्नाला उणापुरा दीड महिना होतोय. पण दीड महिना पूर्ण होत नाही, तोच सोनमने येणाऱ्या बाळाबदद्ल बोलणे सुरू केले आहे.
सोनमने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले, ‘माझ्या मुलांच्या नावासोबत माझे नाव जावे, हे मी कधीचेच ठरवले आहे. आपला समाज पुरूषप्रधान आहे. त्यामुळे माझ्या नावासोबत वडीलांचे नाव लागले. मी वडिलांवर प्रचंड प्रेम करते. त्यामुळे लग्नानंतरही मी माझ्या नावातून त्यांचे सरनेम गाळले नाही. मात्र माझ्या मुलांच्या नावासोबत आई-वडिल दोघांचेही नाव असावे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्या मुलांचे सरनेम सोनम अहुजा असे असेल.
लग्नानंतर सोनमने आपले नाव बदलून सोनम कपूर अहुजा असे केले आहे तर सोनमचा पती आनंद यानेही आपल्या नावात बदल करून आनंद सोनम अहुजा असे नवे नाव धारण केले आहे. लग्नानंतर आनंदने त्याचे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने माझाही सल्ला घेतला. मी आनंद अहुजा कपूर असे नाव ठेवू की, आनंद कपूर अहुजा असे ठेवू, असे त्याने मला विचारले. पण कपूर हे माझ्या वडिलांचे आडनाव आहे, असे सांगितल्यावर त्याला ते पटले. मग त्याने आनंद सोनम अहुजा हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.
आता आमच्या पासपोर्टवरही आमची ही बदललेली नावे आहेत, असे सोनमने सांगितले.