रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:32 PM2024-10-20T12:32:32+5:302024-10-20T12:32:55+5:30

हा व्हिडिओ ऋषिकेशमधला आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचीच खिल्ली उडवली आहे.

actor Sunil Grover getting troller for his recent video from hrishikesh | रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'

रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover) त्याच्या हटके व्हिडिओंमुळे चर्चेत असतो. त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमीच काही ना काही भन्नाट असतं जे पाहून नेटकरी हसतात. अनेकदा सुनील ग्रोवर भारताच्या कानाकोपऱ्याच फिरत असताना सामान्य माणसांसोबतचे मजेशीर व्हिडिओही पोस्ट करतो. परंतु नुकतंच त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. त्याने केलेली मजा त्यालाच भोवली आहे.

रस्त्याच्या कडेला आपण अनेकदा मजूरांना झोपलेलं बघतो. सुनीलने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका मजुराच्या बाजूला जाऊन त्याच पोझिशनमध्ये झोपतो. हा व्हिडिओ ऋषिकेशचा आहे. सुनीलने तिथे देवदर्शन केलं. गंगेत स्नान केलं. तेथील लोकप्रिय जेवणंही चाखलं. यानंतर पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुराच्या बाजूला जाऊन तो झोपला. हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, "आणि काय हवं सांगा.'


सुनीलच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'भाई व्हिडिओ बनला आता उठ','पुढच्या वेळी चटई घेऊन ये बाकीच्यांजवळ आहे तुझ्याकडेच नाही','इतक्या दिखाव्याची गरज नाही. ते झोपलेले मजूर लोक आहेत थकवा दूर करण्यासाठी झोपले आहेत आणि तू व्हिडिओ बनवण्यासाठी' अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

Web Title: actor Sunil Grover getting troller for his recent video from hrishikesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.