या अभिनेत्याच्या मुलीने शेअर केला त्याचा जुना फोटो, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 06:27 PM2020-02-22T18:27:19+5:302020-02-22T18:28:01+5:30
याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमेऱ्यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर तिचे हॉट आणि सेक्सी फोटो नेहमीच पोस्ट करत असते. पण नुकताच इराने तिच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला असून याच फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
इराने तिचे वडील आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सांताची मदत करणारा असे त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे. या फोटोत चिमुकली इरा खूपच छान दिसत असून आमिर खानचा एक वेगळाच लूक यात पाहायला मिळत आहे. आमिरचे केस वाढलेले असून त्याची मिशा देखील घनदाट आहेत. त्याचा हा लूक मंगल पांडे या चित्रपटातील असावा असा अंदाज नेटकरी लावत आहेत. मंगल पांडे हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हा फोटो 15 वर्षांपूर्वीचा असेल असे म्हटले जात आहे. त्याचसोबत या फोटोत आपल्याला किरण रावला देखील पाहायला मिळत आहे. इरा आणि आमिरचा हा फोटो आमिरच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा फोटो शेअर करून केवळ पाच तास झाले असले तरी 15 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
काही महिन्यांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा आणि मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्म मेकिंगमध्ये तर मुलगा जुनैदला अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'Euripides Medea' हे नाटक ती दिग्दर्शित करणार आहे. या नाटकातून युवराज सिंगची पत्नी हेजल किच अभिनयक्षेत्रात कमबॅक करतेय.