तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:24 PM2024-09-18T13:24:24+5:302024-09-18T13:25:41+5:30

ओटीटी माध्यम गाजवणारी अभिनेत्री तीन वर्षांपासून बेरोजगार आहे.

actress Aahana Kumra is out of work for more than three years dosent getting any offers | तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."

तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."

ओटीटी माध्यम गाजवणारी अभिनेत्री तीन वर्षांपासून बेरोजगार आहे. एकापेक्षा एक वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं आहे. मात्र अभिनय क्षेत्रात कधी काम मिळणं बंद होईल सांगता येत नाही. असंच काहीसं या अभिनेत्रीबाबतीत झालं आहे. कोण आहे ती?

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या गाजलेल्या सिनेमात दिसलेली अभिनेत्री आहाना कुमरा (Aahana Kumra). आहानाने 'इंडिया लॉकडाऊन',' कॉल माय एजंट', 'एजंट राघव', 'बेताल' या काही सीरिज, सिनेमांमध्ये काम केलं. मात्र आता अभिनेत्रीकडे तीन वर्षांपासून कामच नाहीए. या संघर्षाविषयी हिंदुस्तान टाईम्सशी बातचीत करताना आहाना म्हणाली, "मला आता शो ऑफर होत नाहीत. तीन वर्षांपासून मला कामच मिळालेलं नाही. मी ओटीटीवर खूप काम करायचे. मात्र गेल्या काही वर्षात मी काम केलेलं नाही.  लोक एका वर्षात १ किंवा २ शो करतात मी तेही करुन शकले नाही. माझ्यासोबतच नक्की हे का होतंय मला कळत नाहीए."


ती पुढे म्हणाली, "मेकर्स अशा कलाकारांकडे जातात जे मानधन कमी घेतली.  पण मला माझं घर चालवायचंय. आता मी सिनेमाच्या अल्टरनेट फॉर्म्सचा विचार करत आहे. आयुष्यात वेगळं काहीतरी करायचा विचार करत आहे. चांगली अभिनेत्री चा टॅग मी मिळवला त्यामुळे आता माझं काम झालं आहे. जर तुम्ही चांगले कलाकार असाल तर कोणीही तुम्हाला काम देत नाही. जर मला कामच मिळत नाहीए तर हा टॅग घेऊन काय करु. मला माझी बिलंही भरायची आहेत."

आहानाने स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे. याविषयी ती म्हणाली, "जेव्हा आमच्याजवळ काही असेल तेव्हा घोषणा करताना आनंद होईल. काही दिवसांपूर्वीच प्रोडक्शन हाऊसची पूजा झाली. मी ओटीटी आणि थिएटर दोन्हीसाठी प्रोजेक्ट्स करेन. माझं सगळं लक्ष सध्या त्यातच आहे."

Web Title: actress Aahana Kumra is out of work for more than three years dosent getting any offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.