'आमची मत वेगळी असली तरी..'; ऐश्वर्या नारकरांनी उघड केलं अविनाशसोबतच्या नात्याचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:40 AM2023-08-10T11:40:01+5:302023-08-10T11:40:47+5:30

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

actress-aishwarya-narkar-writes-a-special-post-for-her-husband-avinash-narkar | 'आमची मत वेगळी असली तरी..'; ऐश्वर्या नारकरांनी उघड केलं अविनाशसोबतच्या नात्याचं सत्य

'आमची मत वेगळी असली तरी..'; ऐश्वर्या नारकरांनी उघड केलं अविनाशसोबतच्या नात्याचं सत्य

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) अविनाश नारकर (avinash narkar) या जोडीकडे पाहिलं जातं. कलाविश्वासोबतच या जोडीचा सोशल मीडियावरही तगडा वावर वावर आहे. त्यामुळे ते कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. यात बऱ्याचदा ते एकमेकांसोबतचे डान्स व्हिडीओ शेअर करतात. यावेळी ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत अविनाश नारकर यांच्याविषयी भाष्य केलं. अविनाश नारकर यांच्यासोबतचं त्यांचं नात कसं आहे हे त्यांनी कॅप्शनच्या स्वरुपात सांगितलं.

ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर अविनाश यांच्यासोबतची एक रिल शेअर केली आहे. या रिलमध्ये त्या दोघांनी एकमेकांना वी आर बेस्ट फ्रेंड्स, असं म्हटलं आहे. त्यानंतर कॅप्शनमध्ये ऐश्वर्या यांनी अविनाशसाठी एका पोस्ट लिहिली आहे.

ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव माहितीये का? लग्नापूर्वी 'या' नावाने होती त्यांची ओळख

 “आता २५ हून अधिक वर्षं झाली…त्याने कायम मला पाठिंबा दिला. ज्या गोष्टी मी करू शकेन की नाही असं मला वाटायचं त्या करायला त्याने नेहमी मला प्रोत्साहन दिलं. मला स्वत:चा शोध घ्यायला मदत केली. काही बाबतीत आमची मतं वेगळी असली तरीही आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. यालाच आनंदी आयुष्य म्हणतात. मला माहितीये की एक मित्र म्हणून तू नेहमी माझ्यासोबत होतास, आहे, आणि यापुढेही असशील. न संपणारी मैत्री...; असं ऐश्वर्या यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

'बादल बरसा बिजुली..' अविनाश नारकरांनी फॉलो केला ट्रेंड; तुम्ही पाहिला का भन्नाट video

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्यांदाच इतकं मोकळेपणाने त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. ही जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांना अमेय हा एक मुलगादेखील आहे.
 

Web Title: actress-aishwarya-narkar-writes-a-special-post-for-her-husband-avinash-narkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.