'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री थेट बिग बींसोबत चमकली! KBC च्या नव्या जाहिरातीमध्ये वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 04:43 PM2024-06-30T16:43:21+5:302024-06-30T16:45:07+5:30

रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीला अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे (anagha bhagare)

actress anagha Bhagare share screen with amitabh bachchan kbc 16 new advertise | 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री थेट बिग बींसोबत चमकली! KBC च्या नव्या जाहिरातीमध्ये वर्णी

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री थेट बिग बींसोबत चमकली! KBC च्या नव्या जाहिरातीमध्ये वर्णी

'रंग माझा वेगळा', 'दिल दोस्ती दोबारा' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे. अनघाने फार कमी कालावधीत मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. अनघाचे फॅन्स तिला नवनवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनघा सुद्धा कधी मालिका, कधी जाहिरात,  कधी मॉडेलिंग अशा विविध माध्यमात कार्यरत असते. अनघाला थेट बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC च्या नव्या पर्वातील जाहिरातीसाठी काम करण्याची संधी मिळालं आहे.

अनघा भगरे चमकली अमिताभ बच्चन यांच्यासोबत

अनघा भगरेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. KBC च्या नवीन सीझनचा हा व्हिडीओ असलेला दिसून येतो. व्हिडीओत पाहायला मिळतं की, नोकरीतून निवृत्त बँक मॅनेजर कॅब चालवतो. तो कॅब बंद करुन घरी येतो. तेव्हा त्याची मुलं त्याला प्रश्न विचारतात. तुम्ही हे का करताय? लोक काय म्हणतील असा प्रश्न ते बाबांना विचारतात. तेव्हा बाबा एका उत्तराने त्यांना शांत करतात. नंतर अमितााभ बच्चन यांची जाहिरातीत एन्ट्री होते. अशाप्रकारे अनघाला अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.

अनघा या सुवर्णसंधीबद्दल काय म्हणाली?

अनघाने या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्यात. अनघा कॅप्शनमध्ये लिहिते, "फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणंं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे." अशा शब्दात अनघाने तिच्या भावना व्यक्त केल्यात. अनघा काही दिवसांपूर्वी 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत झळकली. सध्या ती पुण्यात 'वदनी कवळ' या तिच्या हॉटेलचं काम पाहत असते.

Web Title: actress anagha Bhagare share screen with amitabh bachchan kbc 16 new advertise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.