रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 17:28 IST2018-05-22T17:27:30+5:302018-05-22T17:28:21+5:30
आजपर्यंत दोघांनी कधीही आपल्या नात्याबाबत मीडियात काही स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र तरीही दोघांमधील प्रेम आणि केमिस्ट्री सोशल मीडियातून दिसतं.

रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. पण आजपर्यंत दोघांनी कधीही आपल्या नात्याबाबत मीडियात काही स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र तरीही दोघांमधील प्रेम आणि केमिस्ट्री सोशल मीडियातून दिसतं.
असे म्हणतात की, मनातील गोष्ट ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं दीपिकासोबत नुकतंच घडलं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दीपिका रणवीरबाबत म्हणाली होती की, रणवीर फारच एनर्जेटीक माणूस आहे. यासोबतच ती म्हणाली होती की, रणवीर हा केवळ चांगला माणूसच नाहीतर त्याचं मनही मोठं आहे.
रणवीर सिंगचं कौैतुक करताना अनेकजण तो फारच एनर्जेटीक आहे. पण दीपिका त्याही पलिकडचा रणवीर लोकांना सांगायचा होता असंच तिच्या या प्रतिक्रियेतून दिसतं. कदाचित रणवीर केवळ एनर्जेटीक या एकाच प्रकारात कुणी बांधू नये, म्हणून तिने हे सांगितले असावे.
महत्वाची बाब म्हणजे दीपिका म्हणाली की, रणवीर कधीही कुणासमोर रडत नाही. कारण तो फारच इमोशनल आणि सेन्सिटीव्ह आहे. आणि त्याच्या याच गोष्टीवर दीपिकाला खूप प्रेम आहे. ही गोष्ट दीपिकाने पहिल्यांदास सांगितली आहे. यावरुन दोघांमध्ये किती प्रेम आहे हे दिसून येतं.