राघव-परिणीतचं नाही तर 'या' अभिनेत्रींनी राजकीय नेत्यासोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 07:14 PM2023-09-22T19:14:38+5:302023-09-22T19:20:28+5:30

आताच्या घडीला अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी राजकारण्यांसोबत संसार थाटला. राजकारण आणि बॉलिवडूचा गेल्या अनेक दशकांचा संबंध आहे. 

actress got married with a political leader | राघव-परिणीतचं नाही तर 'या' अभिनेत्रींनी राजकीय नेत्यासोबत थाटला संसार

bollywood

googlenewsNext

सध्या बी टाऊनमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे.  दोघांचा उदयपूर येथे शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. परिणीती चोप्रा बॉलिवूडशी संबंधित आहे. तर दुसरीकडे राघव चढ्ढा आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. केवळ परिणीती चोप्राच नाही तर आताच्या घडीला अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी राजकारण्यांसोबत संसार थाटला. राजकारण आणि बॉलिवडूचा गेल्या अनेक दशकांचा संबंध आहे. 


अभिनेत्री स्वरा भास्कर हिने राजकीय नेते फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. 6 जानेवारीला यांचे लग्न पार पडले होते. फहाद अहमद हे समाजवादी पक्ष युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2020 मध्ये एका आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यांचा दोघांचा पहिला सेल्फेही आंदोलनादरम्यान घेण्यात आला होता. आंदोलनातच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपातंर झालं. शिवाय आता ती लवकरच आई देखील होणार आहे. फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेकांनी स्वरा भास्कर हिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.


 टारझन द वंडर कार आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटांमध्ये आयशा टाकिया झळकली. आयशाने नेते फरहान आझमी यांच्याशी 2009 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर मात्र तीने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. फरहान आझमी हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. एवढंच नाही तर तिने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते लपवून ठेवले होते.  आता ती गृहिणीचे जीवन जगत असून फरहान आणि आयशाला एक मुलगाही आहे, ज्याचं नाव मिकेल आहे.


प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनीही नेते रवी राणासोबत लग्न केले. सामूहिक विवाहसोहळ्यात हे लग्न झालं होतं. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.  नवनीत राणा यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. लग्नानंतर नवनीत कौर राणा यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या अमरावतीच्या खासदार आहेत.


शिवाय, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी राधिका कुमारस्वामी या देखील दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. कुमारस्वामी आणि राधिका 2005 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांची जवळीक वाढू लागली. राधिका यांनी 2006 मध्ये माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न केले. कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात खूप फरक आहे. शिवाय, कुमारस्वामी आणि राधिका या दोघांचे हे दुसरे लग्न होते. याआधी दोघांचे लग्न झाले होते. 

 

Web Title: actress got married with a political leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.