"अभिनेत्रीने माफी मागावी",चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:09 PM2021-12-08T13:09:09+5:302021-12-08T13:10:07+5:30

निदान सॉरी म्हणण्यासाठी तरी फोन करायला हवा होता असेही तुषार देवलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Actress Gulki Joshi should apologize, Chala Hawa Yeu dya FameTushar deval Get Angry, Know Why | "अभिनेत्रीने माफी मागावी",चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय मनस्ताप

"अभिनेत्रीने माफी मागावी",चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय मनस्ताप

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya ) या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात.या शोने फक्त कलाकारांनाच नाहीतर शोमध्ये इतर आर्टीस्ट्सनाही ओळख मिळवून दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे तुषार देवल (Tushar Deval). शोमध्ये तुषार संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो.त्याचबरोबर काही विनोदी स्कीटमध्येही त्याचा सहभाग असतो. या शोमुळे तुषारही प्रचंड प्रसिद्ध आहे.

तुर्तास तुषारला सध्या वेगळ्याच गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. हिंदी मालिकेत काम करणार्‍या अभिनेत्रीमुळे सध्या त्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत घडलेला प्रकाराचा खुलासा केला आहे. हिंदी टीव्ही अभिनेत्री गुलकी जोशीने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सिंटाचे कार्ड दाखवले. त्यात तुषारचा मोबाईल नंबर होता. हा मोबाईल नंबर ब्लर न करताच तो अपलोड करण्यात आला. मोबाईल नंबर हा ख्यातीचा समजून लोक तुषारलाच फोन करुन पिडत आहेत.

दिवसाला जवळ जवळ १०० कॉल येत आहेत. अनेकांना तुषारने हा ख्यातीचा नंबर नसल्याचेही सांगितले. पण तरीही काही फायदा झाला नाही. अखेर त्याने एका मित्राच्या मदतीने ख्यातीपर्यंत घडलेला प्रकार पोहचवला. ख्यातीने व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर ब्लर केला. पण हे सगळं करण्यात खूप उशीर झाला होता तोपर्यंत हा नंबर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे अजूनही कॉल वर कॉल येत असल्याचे तुषारने म्हटलंय. ख्यातीने निदान सॉरी म्हणण्यासाठी तरी फोन करायला हवा होता असेही त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

गुलकी जोशी (Gulki Joshi) ही मालिका विश्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रचंड मोठा तिचा चाहता वर्ग आहे.ख्यातीने अनेक मालिका आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. 'मॅडम सर' या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकत आहे. याआधी 'वागळे की दुनिया', 'तेरा यार हुं मै', 'जिद्दी दिल माने ना' यासारख्या हिंदी मालिका साकारल्या आहेत. 
 

Web Title: Actress Gulki Joshi should apologize, Chala Hawa Yeu dya FameTushar deval Get Angry, Know Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.