जंगलराज टास्कमध्ये बंदूक मिळवताना जान्हवी कळवळली, झाली मोठी दुखापत! नवीन प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:28 PM2024-09-16T12:28:07+5:302024-09-16T12:28:34+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज नवीन आठवड्यातलं नॉमिनेशन कार्य होणार असून जान्हवीला मोठी दुखापत झाल्याचं दिसतंय (bigg boss marathi 5)

actress Jahnavi killekar got injured while playing in Jungleraj task in bigg boss marathi 5 new promo | जंगलराज टास्कमध्ये बंदूक मिळवताना जान्हवी कळवळली, झाली मोठी दुखापत! नवीन प्रोमो बघाच

जंगलराज टास्कमध्ये बंदूक मिळवताना जान्हवी कळवळली, झाली मोठी दुखापत! नवीन प्रोमो बघाच

'बिग बॉस मराठी'च्या घरात दरदिवशी काहीतरी वेगळं आणि रंजक गोष्टी बघायला मिळतात. बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु होऊन आता ५० दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आजपासून नवीन आठवडा सुरु झालाय. नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सदस्यांमध्ये नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. जंगलराज असं या कार्याचं नाव असून या टास्कमध्ये खेळताना जान्हवीला मोठी दुखापत झाल्याचं समजतंय. 

जान्हवीला खेळताना मोठी दुखापत 

नवीन आठवड्यात 'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात जंगलराज असलेलं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा टास्क आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये जंगलराज टास्कमध्ये शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होईल. टास्कमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,"आपल्याला ते षडयंत्र वापरावं लागेल". तर अरबाज म्हणतोय,"काहीही करा लीड आपल्याला करायचं आहे". निक्की म्हणतेय,"टीम वाटलीच पाहिजे". प्रोमोमध्ये शेवटी जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजीत तिला पाणी द्यायला सांगत आहे.


कोणती टीम जिंकणार? कोणती हरणार?

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज पार पडणाऱ्या जंगलराज टास्कमध्ये कोण राज्य करणार आणि कोण बंदूक मिळवून ठरणार खरा शिकारी? हे प्रेक्षकांना आजच्या भागात बघता येईल. टास्कमध्ये जान्हवी पडल्याने तिला मोठी दुखापत झालीय का? याशिवाय ती या खेळातून बाद होणार का? याचीही उत्तरं प्रेक्षकांना आज मिळतील. दरम्यान प्रोमो पाहून जान्हवीला दुखापत झाल्याने तिच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे.

Web Title: actress Jahnavi killekar got injured while playing in Jungleraj task in bigg boss marathi 5 new promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.