लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:00 PM2022-11-19T13:00:52+5:302022-11-19T13:28:42+5:30

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात लिव्ह इन रिलेशनशीपचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणावरुन देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

Actress kanishka soni gave a shocking reaction on Shraddha Walker murder case and live in relationship | लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा

लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात लिव्ह इन रिलेशनशीपचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणावरुन देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री कनिष्का सोनीनेही प्रतिक्रिया देत तिचे अनुभव शेअर केले आहेत. तिनेही असा अनुभव घेतल्याचे यात म्हटले आहे. 

'श्रद्धा ज्या प्रकरणातून गेली त्याच प्रकरणातून मी गेली आहे. मला प्रपोज करताना तो मला लग्नाबद्दल बोलला होता. जेव्हा मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला त्याचा राग, हिंसक स्वभाव आणि मद्यपानाच्या सवयी सहन कराव्या लागल्या. लग्नानंतर कदाचित त्याच्यात सुधारणा होईल असं मला वाटायचे. मी अनेकवेळा त्याच्या घरी राहिले होते. त्याने मला अनेकवेळा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह केला, असं कनिष्क सोनी म्हणाली.  

साई पल्लवी, अनुष्का शेट्टीच नाही तर साऊथच्या या लोकप्रिय अभिनेत्री अद्याप आहेत सिंगल

'पण, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या विरोधात होती. त्यामुळे जास्तवेळ त्याच्या घरी राहत होते. मला वाटत होते, तो कधीतर लग्न करेल. एक दिवस मी त्याला लग्नासाठी विचारले. मी त्याच्या घरी लग्नासाठीच थांबले होते. त्याने मला लवकरच लग्न करुया असं सांगितले होते. मी त्याच्यासोबत अनेक स्वप्न पाहिली होती. मी ज्या दिवशी त्याला लग्नासाठी विचारले त्या रात्री त्याने मारहाण केली, यावेळी तो मला ठार मारेल याची भीती वाटत होती. त्याच रात्री मी त्याच्या घरुन पळून गेले, असा गौप्यस्फोट कनिष्क सोनीने केला. 

'आपल्या देशातील मुली टाइमपाससाठी लिव्ह इनसारखा मोठा निर्णय घेणार नाहीत. मी लिव्ह-इनवर मुलींनाही हेच मत देऊ इच्छिते की, वातावरण बदलले असले तरी जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका. अशा वाईट मानसिकतेच्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मुलींनी एकटे राहून आपले आयुष्य जगलेले बरे, असंही कनिष्क सोनीने म्हणाली. आमच्या इंडस्ट्रीतील स्टार्स या विषयावर काहीच का बोलत नाहीत. ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे, असंही कनिष्क म्हणाली. 

Web Title: Actress kanishka soni gave a shocking reaction on Shraddha Walker murder case and live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.