'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:43 PM2023-03-30T15:43:04+5:302023-03-30T15:43:50+5:30

लावणी माहित नसणाऱ्यांना अभिनेत्री मेघा घाडगेचे चारोळीतून उत्तर

actress megha ghadge takes dig at gautami patil dance says those who dont understand lawni dont call youself marathi | 'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा

'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा

googlenewsNext

महाराष्ट्रात एका तरुणीच्या नृत्याने अनेकांना वेड लावलं आहे. एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे ती तरुण प्रसिद्धीझोतात आली आणि आता तिच्या कार्यक्रमांमध्ये अक्षरश: राडा होईल इतकी गर्दी होते. गावागावात कार्यक्रम घेत ती रेकॉर्डब्रेक गर्दी खेचून आणते. ती तरुणी कोण हे तुम्ही ओळखलंच असेल. होय गौतमी पाटील. (Gautami Patil) गौतमीची लोकप्रियता कितीही वाढली असली तरी तिच्यावर टीकाही होत असते. तिचा डान्स हा अश्लील असून त्याला लावणी असं म्हणू नका अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. आता लावणी सम्राज्ञी मेघा घाडगेने (Megha Ghadge) अप्रत्यक्षरित्या गौतमीवर टीका केली आहे.

अभिनेत्री मेघा घाडगेने चारोळी लिहिली आहे. या चारोळीतून तिने ज्यांना लावणी कळत नाही त्यांना टोला लगावला आहे. मेघा लिहिते, 'थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका, देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही, ज्याला माहित नाही लावणी त्याला मराठी म्हणू नका'.

या चारोळीतून मेघाची लावणीप्रती कळकळ व्यक्त होत आहे. गौतमीच्या डान्सला लावणी म्हणणं याला अनेकांचा विरोध आहे. मात्र सध्या तिच्या डान्सचे तरुणांना भुरळ घातली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी नृत्यशैलीत बदल करेन असं म्हणत तिने अजित पवारांची माफी मागितली होती. यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.वाढदिवस असो, किंवा लग्न, किंवा राजकीय कार्यक्रम गौतमीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ती एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये घेते. तिच्या कार्यक्रमांना पोलिस सुरक्षाही द्यावी लागते.

Web Title: actress megha ghadge takes dig at gautami patil dance says those who dont understand lawni dont call youself marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.