कोरोनाचा धसका : या बयेने काय केले तर स्वत:ला वॉशिंग मशीनमध्ये कोंडून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:55 PM2020-03-17T13:55:36+5:302020-03-17T13:57:12+5:30

पाहा व्हिडीओ

actress miley cyrus hides inside her washing machine due to coronavirus-ram | कोरोनाचा धसका : या बयेने काय केले तर स्वत:ला वॉशिंग मशीनमध्ये कोंडून घेतले

कोरोनाचा धसका : या बयेने काय केले तर स्वत:ला वॉशिंग मशीनमध्ये कोंडून घेतले

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे हॉलिवूड प्रचंड हादरले आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनमध्ये जन्मलेला कोरोना व्हायरस जवळजवळ अख्ख्या जगात पसरलाय. सेलिब्रिटींनी तर कोरोनाचा प्रचंड धसका घेतला आहे. सगळे मास्क लावून फिरताहेत. काही सेलिब्रिटींनी स्वत:ला घरात कोंडून घेतलेय तर  गायिका एरिका बाडू सारख्या काहींनी अनोखी शक्कल लढवत  खास ड्रेसच तयार केला आहे. पण हॉलिवूडची पॉप स्टार माइली सायरस हिने सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. होय, या बयेने कोरोनापासून बचावासाठी काय करावे? तर स्वत:ला चक्क वॉशिंग मशीनमध्ये कोंडून घेतलेय.


होय,माइलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वॉशिंग मशीनच्या आत बसलेली दिसतेय. व्हिडीओची सुरुवात एका कॅमे-यासोबत होते. हा कॅमेरा आधी वॉशिंग मशीन दाखवतो आणि नंतर वॉशिंग मशीनचा दरवाजा उघडल्या जातो. दरवाजा उघडल्यावर काय तर माइली पांढरे ब्लँकेट अंगभोवती गुंडाळून वॉशिंग मशीनमध्ये बसलेली दिसतेय. तिच्या चेह-यावरची भीती स्पष्ट दिसतेय. वॉशिंग मशीनमध्ये जागा नाही. पण कोरोनाची भीती इतकी की, काइली तेवढ्या जागेतही फिट बसलीय.


कोरोना व्हायरसमुळे हॉलिवूड प्रचंड हादरले आहे. कोराना व्हायरसने हजारोंचे बळी घेतले. लाखो लोकांना ग्रासले. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही. हॉलिवूडमध्ये कोरोनाने ग्रासले आहे.

काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिदध अभिनेता टॉम हँक्स यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर ‘जेम्स बॉन्ड’ची अभिनेत्री   ओल्गा कुरीलेन्को  हिलाही कोरोनाची बाधा झाली. आता ब्रिटीश अभिनेता इडरिस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच काय तर गेम आॅफ थ्रोन्समध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या क्रिस्तोफर हिव्ह्यूला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.

Web Title: actress miley cyrus hides inside her washing machine due to coronavirus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.