Video : महिलांनाच का कोपरा शोधावा लागतो? बेधडक नीना गुप्तांचा बेधडक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:42 AM2020-04-27T10:42:28+5:302020-04-27T15:27:00+5:30

Video : व्हाय कान्ट वुमेन फार्ट?

actress Neena Gupta asks why women are expected to be perfect: 'Women never have gas, acidity, they do not burp-ram | Video : महिलांनाच का कोपरा शोधावा लागतो? बेधडक नीना गुप्तांचा बेधडक सवाल

Video : महिलांनाच का कोपरा शोधावा लागतो? बेधडक नीना गुप्तांचा बेधडक सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास सोशल मीडियावर नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

ही अभिनेत्री एक स्ट्राँग लेडी आणि सिंगल वूमन म्हणून ओळखली. म्हणायला तिने वयाची साठी ओलांडलीय. पण आजही ती तितकीच बोल्ड, बिनधास्त आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. एकेकाळी नीना यांनी लग्न न करता आई बनण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. पण नीना यांनी या परिणामांची चिंता न करता स्वत:चे आयुष्य स्वत:च्या अटींवर जगले. आजही त्या तितक्याच बिनधास्त आयुष्य जगतात. तर आता या बिनधास्त अभिनेत्रीने एक बिनधास्त व्हिडीओ शेअर केला आहे. होय, या व्हिडीओत नीना  महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत आहेत.

काय म्हणाल्या नीना
नीना या व्हिडीओत म्हणतात, ‘बायकांना कधी गॅस होऊ शकत नाही? त्यांना कधी अ‍ॅसिडीटी होऊ शकत नाही? त्या ढेकर देऊ शकत नाहीत? अनेकदा महिलांना शिळं अन्न खातात,  यामुळे त्यांच्या पोटात दुखतं मात्र तरीदेखील त्या खुलेपणे बोलत नाहीत, या व अशा मुद्यांवर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.
 महिलांना गॅस होत नाही? त्यांना अपचन होत नाही? त्यांना ढेकर येत नाही? सध्या लॉकडाउन असल्यामुळे सगळे आपआपल्या घरात आहेत़. घरात महिला वेगवेगळ्या डिशेस बनवत आहेत. अनेकदा अन्न जास्त बनवल्या जात. सहाजिकपणे कधीकधी जेवण शिल्लक राहतं.  शिल्लक राहिलेलं शिळं अन्न महिला खातात त्यामुळे त्यांना त्रास होतो. कधी कधी त्याही अधिक  खातात. अशात त्यांना गॅस झाला तर का त्या फार्ट करू शकत नाहीत? ढेकर देऊ शकत नाहीत? महिला त्यांना वाट्टेल तशा का बसू शकत नाहीत? पुरुष त्यांना वाट्टेल तसे वागू शकतात. कधीही कुठेही गॅस सोडू शकतात. तर मग महिलांनाच का लाजतात? त्यांनाच का फार्टसाठी एखादा कोपरा शोधावा लागतो? का? माझा हा एकच सवाल आहे. महिलांनीच असहज आयुष्य का जगावे?

तूर्तास सोशल मीडियावर नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अर्थात नेहमीप्रमाणे या व्हिडीओवरून लोक गटात विभागले गेले आहेत. अनेकांनी या व्हिडीओला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून नेहमीप्रमाणे नीना यांना ट्रोल केले आहे.  अर्थात नीना यांना यामुळे काहीही फरक पडत नाही़ स्वत:चे विचार असे बेधडक मांडायलाही हिंमत लागते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 


 

Web Title: actress Neena Gupta asks why women are expected to be perfect: 'Women never have gas, acidity, they do not burp-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.