नॉनव्हेज सोडल्याने अशी झाली अभिनेत्रीची अवस्था, म्हणाली, 'माझं आरोग्य आधीपेक्षा जास्त...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:00 PM2023-06-14T14:00:43+5:302023-06-14T14:03:23+5:30
तिने आपल्या फिटनेसमध्ये झालेला मोठा बदल शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाली आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमात तिने इमरान खान च्या मुलीची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली. तर सध्या ती 'सास, बहू और फ्लेमिंगो'चे यश सेलिब्रेट करत आहे. दरम्यान तिचा आणखी एक सिनेमा 'कच्चे लिंबू' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. राधिकाने टीव्ही ते सिनेमा असा यशस्वी प्रवास केला. नुकतंच तिने आपल्या फिटनेसमध्ये झालेला मोठा बदल शेअर केला आहे.
राधिकाने एका मुलाखतीत सांगितले, 'मी नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं आहे. आधी मी खूप नॉनव्हेज खायचे. पण मी आता व्हेगन झाले आहे. म्हणजेच फक्त नॉनव्हेज नाही तर मी दूध आणि दूधाचे पदार्थ खाणेही सोडलं आहे. प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याच अन्नाचं मी सेवन करणार नाही. आता फक्त वनस्पतींपासून तयार होणारे अन्न मी खाते.'
ती पुढे म्हणाली, 'या निर्णयामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. याटा माझ्या मानसिक आणि शारिरीक स्वस्थ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. मला आता आधीपेक्षा जास्त आरोग्यदायी वाटतंय. मांस आणि दूध खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त व्हेगन अन्न खाणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं. माझ्यासाठी व्हेगन बनणं अजिबातच अवघड नव्हतं. कारण मी लहानपणापासूनच पालेभाज्या, वरण भात, छोले हेच खाते. प्रोटीनसाठी मी सातूच्या पीठाचे पदार्थ खाते. डाएटिशियन देखील व्हेगन अन्न खाण्याचं आवाहन करतात. हे अन्न प्रत्येक आजारापासून तुम्हाला दूर ठेवतं.'