आई अन् आजीसोबत झाली अभिनेत्रीची तुलना, हिंदी इंडस्ट्रीत मिळालं नाही काम; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:47 PM2024-11-19T12:47:37+5:302024-11-19T13:23:51+5:30

आजी सुचित्रा सेन आणि आई मूनमून सेन यांचा हिंदी इंडस्ट्रीत होता दबदबा

मुनमुन सेन सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अँड ब्युटीफिल अभिनेत्री. बंगाली सिनेमांसोबतच त्यांनी हिंदीतही लोकप्रियता मिळवली. मूनमून सेन यांची आई सुचित्रा सेन या सुद्धा ६० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.

मुनमुन सेन यांना दोन मुली आहेत. रायमा सेन (Raima Sen) आणि रिया सेन(Riya Sen). दोघींनी आईप्रमाणेच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यांना आजी आणि आईप्रमाणे लोकप्रियता मिळू शकली नाही.

सैफ आणि विद्या बालनच्या 'परिणीता' सिनेमात रायमा सेन दिसली होती. तिने विद्या बालनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 'चोकर बाली' ते आता ' द व्हॅक्सिन वॉर' सिनेमात काम केले आहे.

नुकतंच रायमाने एका वेबसाईटला मुलाखत दिली. यात तिने इंडस्ट्रीतील संघर्षाविषयी सांगितले. तसंच आई, आजीसोबत तुलना होते तेव्हा काय वाटतं याविषयीही ती बोलली.

रायमाला हिंदी इंडस्ट्रीत चांगल्या भूमिका ऑफर झाल्या नाहीत म्हणून सध्या ती बंगाली इंडस्ट्रीत सक्रीय आहे. यामुळेच ती हिंदी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे.

ईटाइम्सशी बोलताना रायमा म्हणाली, "माझ्या आजीच्या वेळी बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनत होते. माझ्यावेळी चित्रच बदललं. बंगाली फिल्म इंडस्ट्रीत मला खूप स्ट्राँग भूमिका मिळाल्या पण हिंदीत मी नेहमीच मागे राहिले."

"पण आज मला आनंद होत आहे की हिंदी सिनेसृष्टी बदलत आहे. महिलांना सोडून प्रत्येक भूमिका चांगली ऑफर केली जात आहे. सहाय्यक कलाकारही चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या भूमिका खरंच स्ट्राँग आहेत."

शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. लोक थिएटरमध्ये जाणं कधी बंद करतील असं मला वाटत नाही. लोकांना सिनेमे बघायला आवडतं आणि हिंदी सिनेमांचा कंटेंट खूप चांगला आहे."

रायमाची बहीण रिया सेन नुकतीच 'कॉल मी बे' या अनन्या पांडेच्या सीरिजमध्ये थोड्यावेळासाठी दिसली. रियानेही हिंदी, साऊथ, बंगाली सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.