सेक्रेड गेम्समधील या मराठी अभिनेत्रीच्या मॅकमाफियाने जिंकला 'एमी अवॉर्ड्स २०१९'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:49 PM2019-11-27T14:49:47+5:302019-11-27T14:59:11+5:30
‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्समुळे ही अभिनेत्री चर्चेत आली होती
अष्टपैलू अभिनेत्री राजेश्री देशपांडे मॅकमाफिया या वेबसिरीजने 'एमी अवॉर्ड्स २०१९' जिंकला आहे. मॅकमाफियाने जिंकलेल्या 'एमी अवॉर्ड्स २०१९' बद्दल व्यक्त होत राजेश्री म्हणते की, "मला अभिमान आहे. मॅकमाफिया बरोबरचं सेक्रेड गेम्सचे देखील त्याच श्रेणीमध्ये नामांकन झाले होते. आपण काम करत असलेल्या भारतीय कलाकृतीला नामांकन मिळत आहे याचा मला खूप आनंद आहे." आंतरराष्ट्रीय फीचर्स आणि कार्यक्रमांशी तुलना न करत भारत दिवसेंदिवस चांगल्या सामग्रीची निर्मिती करीत असल्याचे मत राजेश्री देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. राजेश्रीने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये झळकली आहे. यात ती नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
राजेश्री देशपांडे ही मुळची औरंगाबाद शहरातील आहे. पुणे शहरातील सिंबायोसिस कॉलेजमधून तिने लॉ ची डिग्री घेतली तर त्याच कॉलेजमधून तिने अॅडव्हरटायझिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
राजेश्रीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं ते २०१२ साली. आमिर खानच्या 'तलाश' सिनेमात तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर राजेश्रीने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेत तिने काम केले. त्यानंतर पुन्हा राजेश्री मोठ्या पडद्याकडे परतली. यावेळी तिला सलमान खानच्या 'किक' सिनेमात काम मिळालं. पण ही सुद्धा भूमिका लहान होती.
पुढे तिने 'हरम' या मल्याळम सिनेमात काम केलं. यात तिला डबल रोल साकारायला मिळाला. राजेश्री सर्वात जास्त चर्चेत आली ती जेव्हा वादग्रस्त ठरलेल्या 'सेक्सी दुर्गा' मध्ये मुख्य दुर्गाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. राजेश्रीने ही नंदीता दासच्या 'मंटो' मध्येही एक महत्वाची भूमिका साकारली आहे.