विशाल भारद्वाजच्या सिनेमा 'पटाखा' बनली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 14:38 IST2018-06-26T13:49:52+5:302018-06-26T14:38:07+5:30
दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे पुन्हा एकदा एक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. राजस्थानमधील दोन बहीणींची कथा ते यावेळी घेऊन येत आहेत.

विशाल भारद्वाजच्या सिनेमा 'पटाखा' बनली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा
मुंबई : दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे पुन्हा एकदा एक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. राजस्थानमधील दोन बहीणींची कथा ते यावेळी घेऊन येत आहेत.
'पटाखा' या सिनेमाचं टायटल 'पटाखा' असं असून यात आमिरच्या 'दंगल'मध्ये दिसलेली सान्या मल्होत्रा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं असून या पोस्टरमुळे प्रेक्षकांची सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
विशाल भारव्दाज यांनी पोस्टर ऑनलाईन रिलीज करुन सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. आता त्यांच्या या सिनेमातून दोन बहिणींची काय दाखवली जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sanya Malhotra. Radhika Madan. Sunil Grover. Vijay Raaz... First look poster of Vishal Bhardwaj's #Pataakha... Produced by Dheeraj Wadhawan, Ajay Kapoor, Rekha Bhardwaj and Vishal Bhardwaj... 28 Sept 2018 release. pic.twitter.com/nyZ43M9EGK
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2018
'पटाखा' या सिनेमात सान्या मल्होत्रा आणि राधिका मैदान यांच्यासोबतच सुनील ग्रोव्हर आणि विजय राज यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.