अनिल कपूर यांच्या BB OTT 3 होस्टिंगबद्दल शिल्पा शिंदेची नाराजी? म्हणाली- "झक्कास म्हणणाऱ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 01:31 PM2024-07-10T13:31:08+5:302024-07-10T13:32:02+5:30
सलमान खानच्या जागी अनिल कपूर Bigg Boss OTT 3 चं होस्टिंग करत आहेत. याविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं परखड मत व्यक्त केलंय (Bigg Boss OTT 3, anil kapoor, salman khan)
सध्या Bigg Boss OTT 3 ची चांगलीच चर्चा सुरु आहे. यंदाच्या सीझनमध्ये एक मोठा बदल घडला तो म्हणजे सलमान खानच्या जागी अनिल कपूरने Bigg Boss OTT 3 च्या सूत्रसंचालनाची धूरा सांभाळली. अनिल कपूर यांनी बिग बॉसच्या ग्रँड ओपनिंगला केलेलं सूत्रसंचालन चांंगलंच गाजलं. अनेकांना आवडलंही. पण गेल्या काही दिवसांपासून अनिल कपूर यांनी केलेल्या सूत्रसंचालनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने अनिल कपूर यांच्या Bigg Boss OTT 3 होस्टिंगवर नाराजी व्यक्त केलीय.
अनिल कपूर यांच्या होस्टिंगबद्दल काय म्हणाली शिल्पा?
शिल्पाने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केलाय. ती म्हणाली, "बिग बॉसमध्ये मजा नाही जर सलमान खान त्यात नसेल. होस्ट नाही त्यामुळे काय मजा नाहीय. झक्कास माणसांची जागा वेगळी आहे. बाकी बिग बॉस म्हणजे भाई भाई." असं म्हणत शिल्पाने अनिल कपूर यांच्या होस्टिंगबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केलीय. तुम्हाला माहितच आहे शिल्पा शिंदेने बिग बॉसच्या ११ व्या सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे.
"Host (Salman) nahi hai to maza nahi aa raha. Bigg Boss bole toh Bhai!!!" - Shilpa Shinde #ShilpaShinde#BiggBoss#SalmanKhan#AnilKapoorpic.twitter.com/ThRM2sqvRq
— $@M (@SAMTHEBESTEST_) July 9, 2024
Anil Kapoor ka Alag hi Bigg Boss Chal Raha hai 🤣🤣#BiggBossOTT3#BiggBoss#BBOTT3#AnilKapoor#VishalPandey#SanaMakbul#JioCinema#SaiKetanRao#LuvKatariapic.twitter.com/70lcWDN1MJ
— Anuj Prajapati (@anujprajapati11) June 29, 2024
बिग बॉस ओटीटी 3 बद्दल
बिग बॉस ओटीटी बद्दल सांगायचं तर.. Bigg Boss OTT च्या पहिल्या सीझनचं सूत्रसंचालन करण जोहरने केलं होतं. पुढे Bigg Boss OTT च्या दुसऱ्या सीझनचं होस्टिंग सलमान खानने केलं. तर नुकत्याच रिलीज झालेल्या Bigg Boss OTT च्या तिसऱ्या सीझनचं होस्टिंग अनिल कपूर करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी घरात पायल मलिक-अरमान मलिक-विशाल पांडे यांच्यात राडा झाला. त्यादरम्यान अनिल कपूर यांनी केलेल्या होस्टिंगवर अनेक चांगल्या-वाईट प्रतिक्रिया आल्या.