कोब्रासोबत व्हिडीओ काढणारी अभिनेत्री श्रुती उल्फतला जामीन

By Admin | Published: February 9, 2017 05:01 PM2017-02-09T17:01:51+5:302017-02-09T17:03:59+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'नागार्जुन एक योद्धा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला जामीन मंजूर.

Actress Shruti Ullfat, who is making a video with Cobra, has been granted bail | कोब्रासोबत व्हिडीओ काढणारी अभिनेत्री श्रुती उल्फतला जामीन

कोब्रासोबत व्हिडीओ काढणारी अभिनेत्री श्रुती उल्फतला जामीन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'नागार्जुन एक योद्धा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर श्रुतीचा कोब्रा नागाबरोबर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काल रात्री तिला अटक करण्यात आली होती.  याप्रकरणी बोरीवली न्यायालयाने 5 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  
 
वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन  केल्याच्या आरोपाखाली श्रुती उल्फतसह मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली होती. पशु कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अभिनेत्री श्रुतीला अटक केली होती.  
 
(खाली पाहा व्हिडीओ)
 
व्हायरल झालेला व्हिडीओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुती उल्फतने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे तो  व्हायरल झाला. तो  व्हिडीओ स्पेशल इफेक्टसचा वापर करुन तयार केला असून त्यामध्ये कोणताही जिवंत अथवा मृत साप नाही असं प्रोडक्शन टीमने सांगितलं होतं. मात्र,   वन विभागाने तो व्हिडीओ कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला असता त्यामध्ये व्हिडीओमध्ये जिंवत साप वापरण्यात आल्याचं दिसून आलं. काल चारही जणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. 
 
Ths is d video that got Shruti Ulfat in trouble nd angered animal activists who complained 2 forest dept @PAWSMumbai@RAWW_TWEETS@dnapic.twitter.com/FBdAwfTXFU

Web Title: Actress Shruti Ullfat, who is making a video with Cobra, has been granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.