लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Video शेअर करत व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:39 AM2024-09-13T09:39:06+5:302024-09-13T09:39:25+5:30

महिला सुरक्षारक्षकांची मनमानी, अभिनेत्री आणि तिच्या आईलाही ढकललं

actress Simran Budharup faced misbehaviour at Lalbbaugcha Raja darshan | लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Video शेअर करत व्यक्त केला संताप

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Video शेअर करत व्यक्त केला संताप

गणेशोत्सवात मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षीच मोठी गर्दी होते. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. लालबागचा राजा नवसाला पावतो असं म्हणतात त्यामुळे त्याच्यावर भाविकांची विशेष श्रद्धा. राजाचे चरण स्पर्श करण्यासाठी सगळे आतुरलेले असतात. दरम्यान राजाच्या दरबारात सामान्य लोकांची रांगा वेळी आणि VVIP लोकांचा वेगळा थाट पाहायला मिळतो. तसंच  इथल्या महिला सुरक्षारक्षकांचीही मनमानी असते. एका अभिनेत्रीलाही काल दर्शन घेताना वाईट अनुभव आला. तिने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री सिमरन बुधरुप (Simran Budharup) काल तिच्या आईसोबत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. मात्र तिथे दोघींसोबत गैरवर्तन झालं. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे. सिमरन गर्दीत उभी राहून आईचा फोटो काढत होती. यावेळी महिला सुरक्षारक्षक तिथे आल्या आणि त्यांनी तिच्या आईच्या हातातून मोबाईलच हिसकावून घेतला. सिमरन मध्ये पडली तर तिच्यासोबतही गैरवर्तन केलं. सिमरन याचा व्हिडिओ घेत होती तर तिचाही फोन घेतला. 'असं करु नका, काय करताय तुम्ही? अशा भाषेत ती ओरडतानाही दिसत आहे.  महिला सुरक्षारक्षकांच्या या मनमानीवर तिने संताप व्यक्त केला आहे. 


सिमरनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांनीही यावर कमेंट करत निषेध व्यक्त केला आहे. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनावेळी हे प्रकार पाहायला मिळतात. हजारो भाविकांची गर्दी असते आणि दुसरीकडे VVIP ना वेळच वेळ दिला जातो. लोकांनी मंडळावरही संताप व्यक्त केला आहे. पण दरवर्षी पुन्हा तेच चित्र पाहायला मिळतं. 

Web Title: actress Simran Budharup faced misbehaviour at Lalbbaugcha Raja darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.