अभिनेत्री स्नेहा चव्हाणने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:21 PM2024-11-10T18:21:47+5:302024-11-10T18:24:59+5:30
अभिनेत्री स्नेहा चव्हाणने दुसऱ्यांदा लग्न केली असून ती अभिनेता अनिकेत विश्वासरावची Ex पत्नी आहे (sneha chavan)
अभिनेत्री स्नेही चव्हाणबद्दल मोठी बातमी समोर येतेय. स्नेहा चव्हाणने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. स्नेहाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केलेत. स्नेहाने कोणताही गाजावाजा न करता जवळचे मित्र-मैत्रीण, कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. स्नेहाने अतिशय घरगुती पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. स्नेहाच्या लग्नाचे फोटो बाहेर येताच सर्वांना एक सुखद धक्का बसलाय. स्नेहाचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणी स्नेहाचं अभिनंदन करत आहेत.
स्नेहा चव्हाणच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा
अभिनेत्री स्नेहा चव्हाणच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा झाली आहे. स्नेहाने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. यामध्ये सुरुवातीला स्नेहाचे मित्र, आई-बाबा यांनी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच स्नेहाच्या लग्नाचा घाट घातला आहे. गोडधोडाचं जेवण जेऊन सर्वानी स्नेहा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय नंंतर स्नेहाने होणाऱ्या नवऱ्यासोबत एका क्लबमध्ये पार्टी केलेली दिसत असून तिने केक कापत लग्नाचा आनंद साजरा केला.
स्नेहाने पहिलं लग्न का मोडलं होतं?
२०१८ मध्ये स्नेहाचं पहिलं लग्न अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत झालं होतं. दोघांचा हा प्रेमविवाह होता. परंतु लग्नानंतर काहीच वर्षांनी अनिकेत आणि स्नेहामध्ये घटस्फोट झाला होता. स्रेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. अशातच फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात परत आलेली तेव्हा तिने अलंकार पोलीस ठाण्यात अनिकेत आणि त्याच्या आईवडिलांविरोधात मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले होते. आता स्नेहाने दुसरं लग्न केल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलं असून आयुष्याच्या नवीन सुरुवातीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.