अनिल कपूर यांच्याविषयी बोलताना भावूक झाली सोनम कपूर, म्हणाली- मी नेहमी त्याच्यासारखं.....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:05 PM2023-08-19T13:05:54+5:302023-08-19T13:10:20+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच सिनेमांमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
सोनम कपूर (Sonam Kapoor) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण त्याची कारकीर्द काही खास राहिली नाही. तिने आपल्या करिअरमध्ये फार कमी हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर ही अभिनेत्री पडद्यावरून गायब आहे. आता ती पुन्हा एकदा कमबॅक करण्यासासाठी सज्ज झाली आहे.
यादरम्यान सोनम नुकतीच तिच्या वडिलांविषयी बोलली आहे. यावेळी बोलताना ती भावूकही झाली आहे. यावेळी बोलताना तिने सांगितलं की, ती तिचे वडील अनिल कपूर यांच्याकडून खूप प्रेरित आहे, जे सुमारे 5 दशके चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही काम करण्यास तितकंच प्रेरित करतात!
सोनम म्हणते, “माझ्या वडिलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, ते माझे प्रेरणास्थान आहेत, माझे मुख्य प्रेरक आहेत. ते आता जवळजवळ पाच दशके काम करत आहे आणि तरीही, प्रत्येक दिवस ते कामाचा पहिला दिवस असल्यासारखे उत्साही असतात! माझी इच्छा आहे की मी नेहमी त्याच्यासारखं राहू काम कराव कारण मलाही शक्य तितक्या काळ काम करायचं आहे.”
ती पुढे म्हणते, “सेटवर असणे हे माझे आनंदाचे ठिकाण आहे. कॅमेऱ्यासमोर असणं म्हणजे निव्वळ आनंद आहे. सोनमचे दोन मोठे चित्रपट जे पुढच्या वर्षी फ्लोरवर जाणार आहेत जे तिचे बहुप्रतिक्षित पुनरागमन करतील. मी आता माझ्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत जाण्यास उत्सुक आहे. पुन्हा सेटवर येण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.
सोनम कपूरने तिच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, यापैकी केवळ 5-6 चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.सोनम कपूरचा पती आनंद आहुजा लोकप्रिय बिझनेसमन आहे. त्याची नेटवर्थ इतकी जास्त आहे की बॉलिवूडचे मोठे सेलेब्सही त्याच्यासमोर फिके आहेत. सोनम सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. तिला एक गोंडस मुलगा असून त्यांच नाव वायु कपूर आहुजा आहे.