अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:09 PM2019-04-04T16:09:11+5:302019-04-04T16:10:12+5:30
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाला एक वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. मात्र तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाला एक वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. मात्र तिच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. मदर्स डे दिवशी पुन्हा एकदा श्रीदेवीच्या चाहत्यांना तिला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट 'मॉम' पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे पण भारतात नाही तर चीनमध्ये. याबाबतची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नहाटा यांनी ट्विटरवर दिली आहे.
कोमल नहाटा यांनी ट्विटरवर सांगितले की, 'चीनमध्ये श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट मॉम प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज इंटरनॅशनलने १० मे रोजी श्रीदेवीचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. '
On the occasion of Mother's Day, Zee Studios International will now release late Sridevi's critically-acclaimed film #Mom on May 10 in China. pic.twitter.com/UIp09QVyu8
— Komal Nahta (@KomalNahta) April 4, 2019
जेणेकरून श्रीदेवीचे चीनमधील चाहते हा चित्रपट मदर्स डेला पाहू शकतील. 'मॉम' चित्रपटात श्रीदेवीने आईची भूमिका साकारली आहे. जिचे नाव देवकी असून ती शिक्षिका असते. तिच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिच्या न्यायासाठी लढते. श्रीदेवीच्या मॉम या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटासाठी श्रीदेवीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
श्रीदेवी यांच्या निधनाला वर्ष झाले असले तरी या दुःखातून आजही त्यांचे कुटुंब सावरलेले नाही. श्रीदेवी यांच्या आठवणींना जतन करून ठेवण्यासाठी बोनी कपूर लवकरच श्रीदेवी यांच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री बनवणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूर यांनी श्री, श्रीदेवी आणि श्रीदेवी मॅम हे तीन टायटल रजिस्टर सुद्धा केले आहेत. श्रीदेवी यांनी काम केलेल्या सिनेमांचे टायटलही बोनी कपूर यांनी रजिस्टर केले आहे. त्यांनी एकूण 20 टायटल्स रजिस्टर केली असून या डॉक्यूमेंट्रीमध्ये सगळेच रिअल फुटेज वापरले जाणार आहेत. त्यामुळे श्रीदेवी यांचे जगणे एका वेगळ्याप्रकारे त्यांच्या चाहत्यांसमोर येणार आहे.