आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवीचा वाढदिवस
By Admin | Published: August 13, 2016 01:49 PM2016-08-13T13:49:02+5:302016-08-13T17:40:26+5:30
सुंदर रूप, तडाखेबाज नृत्य आणि तितक्याच दमदार अभिनयाने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवीचा आज (१३ ऑगस्ट) वाढदिवस.
संजीव वेलणकर
पुणे, दि. १३ - सुंदर रूप, तडाखेबाज नृत्य आणि तितक्याच दमदार अभिनयाने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवीचा आज (१३ ऑगस्ट) वाढदिवस.
श्रीदेवीचे पूर्ण नाव श्रीदेवी कपूर आहे. तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'कंदन करुनई' या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. नंतर श्रीदेवीने १३ वर्षे मोठ्या अभिनेता रजनिकांत यांच्या सावत्र आईची भूमिका केली होती. अनेक पौराणिक सिनेमांमध्येur काम केले आहे. तसेटच तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांत कामे केली आहेत.
हिंदी चित्रपटांतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून श्रीदेवी ओळखली जाते. १९९६ साली तिने दिग्दर्शक बोनी कपूर बरोबर लग्न केले. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली. त्यानंतर अनेक वर्षांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पण केले.
श्रीदेवीला लोकमत समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मा.श्रीदेवी यांची गाजलेली गाणी
तेरे मेरे ओठोंपे
नैनो मे सपना
हवा हवाई
सुरमई अखींयो
मेरे हाथोंमे नौ नौ चुडियां