बाहुबलीच्या "सैनिकां"वर प्रत्यक्षात हल्ला
By Admin | Published: April 26, 2017 05:49 PM2017-04-26T17:49:36+5:302017-04-26T18:43:30+5:30
येथील प्रमोशन संपवून मायदेशी परतण्यासाठी बाहुबलीची टीम दुबई विमानतळावर पोलचली होती, त्यावेळी त्यांच्याबरोबर...
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - "बाहुबली-2 द कन्क्ल्यूजन" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वच कलाकार विविध ठिकाणी जात आहेत. प्रमोशन साठी बाहुबलीची टीम दुबईला गेली होती. दुबईवरुन हैदराबाद असा प्रवास करताना बाहुबलीच्या टीम सोबत असभ्य वर्तन आणि वर्णद्वेषावरुन टिपण्णी केल्याची घटना समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा यांनी ट्विट करत याबाबातची माहिती दिली आहे.
येथील प्रमोशन संपवून मायदेशी परतण्यासाठी बाहुबलीची टीम दुबई विमानतळावर पोलचली होती, त्यावेळी त्यांच्याबरोबर गैरवर्तण आणि रंगभेदावरुन हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शोबू यारलागड्डा यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी अमिरात एअरलाईन्स असा आरोप केला आहे.
शोबू यांनी ट्विटमध्ये सांगितले की, यापूर्वी अमिरात एअरलाईन्सने मी खूप वेळा प्रवास केला पण असे काही घडले नव्हते. माझ्याबरोबर झालेला हा पहिलाच प्रकार आहे. दुबईवरुन येतेवेळेस विमानातील स्टाफनेही आमच्यासोबत गैरवर्तन केले. त्यामधील एका कर्मचाऱ्याने आम्हाला वर्णभेदावरुन हिणवले, त्यांचे वागणे अतिशय उद्धट पद्धतीचे होते. विमानातील कर्मचारी कोणत्याही कारणाशिवाय अविरभाव दाखवत असल्याचाही आरोप केला.
दुबईला प्रमोशन साठी बाहुली चित्रपटाचे निर्माते शोबू यारलागड्डा, दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी गेले होते. बाहुबली 2 हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी अभूतपुर्व प्रतीसाद दिला आहे. बाहुबली-2" बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न "कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?" याचं उत्तरही मिळण्याची शक्यता आहे.