'मला कोणाताही पश्चाताप होत नाही...', कंगना रनौतच्या एक्स-बॉयफ्रेंडचा रिलेशनशीपबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 05:35 PM2023-08-01T17:35:46+5:302023-08-01T17:38:51+5:30

कंगनाचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. कंगना अध्ययनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

Adhyayan suman reveals why she spoke about his breakup with kangana ranaut in 2017 | 'मला कोणाताही पश्चाताप होत नाही...', कंगना रनौतच्या एक्स-बॉयफ्रेंडचा रिलेशनशीपबाबत खुलासा

'मला कोणाताही पश्चाताप होत नाही...', कंगना रनौतच्या एक्स-बॉयफ्रेंडचा रिलेशनशीपबाबत खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असत. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते आहे. कंगनाचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. शेखर सुमनचा मुलगा अभिनेता  अध्ययन सुमनदेखील त्यापैकी एक. कंगना अध्ययनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.  

अध्यायनने 2017 मध्ये कंगना राणौतसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले तेव्हा त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्या वेळी तो सार्वजनिकपणे याबद्दल का बोलला याचा खुलासा त्याने आता केला आहे. 

रिपोर्टनुसार, अध्ययन सुमन म्हणाला, ''रिलेशनशीपबाबत  सार्वजनिकरित्या कबुली दिल्याचा मला पश्चाताप होत नाही. हे सांगण्यासाठी मी कोणतीही पत्रकार परिषदचं आयोजन केलं नव्हतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.''

तो पुढे म्हणाला, लोकांना दुसरी बाजू माहिती होती. त्यांना फक्त दुसऱ्याच बाजूबद्दल बोलायचे होते. जेव्हा तुम्ही सार्वजनिक डोमेनमध्ये असता, तेव्हा अनेक मते असतात आणि तुमचा निर्णय पार पाडतात. त्यामुळे ते स्पष्ट करण आवश्यक असतं.  जर त्याला प्रसिद्धीची भूक लागली असती तर तो 2009 मध्ये रिलेशनशिपमध्ये असताना  याबद्दल बोलले असता २०१७मध्ये नाही. तुम्हाला अफेअरमुळे काम मिळत नाही तर ते तुमच्या कौशल्यामुळे मिळतं. लोकांनी माझ्यावर टीका केली पण जेव्हा त्यांना दुसरी बाजू कळली तेव्हा अनेकांनी माझी माफी मागितली.''

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अध्यायन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो. तो आणखी एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करत आहे ज्यामध्ये त्याचे वडील शेखर सुमन मुख्य भूमिकेत असतील.

Web Title: Adhyayan suman reveals why she spoke about his breakup with kangana ranaut in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.