आदिनाथने घेतला जनजागृतीचा वसा!
By Admin | Published: February 5, 2017 02:27 AM2017-02-05T02:27:35+5:302017-02-05T02:27:35+5:30
लो कसंख्या, पर्यटन, रक्तदान, स्वच्छता अशा अनेक गोष्टींबाबत जनजागृती सातत्याने होताना दिसते. या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी सोशलमीडिया, जाहिराती, नाटक,
लो कसंख्या, पर्यटन, रक्तदान, स्वच्छता अशा अनेक गोष्टींबाबत जनजागृती सातत्याने होताना दिसते. या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी सोशलमीडिया, जाहिराती, नाटक, गाणी अशा बऱ्याच माध्यमांतून जनजागृतीचा प्रयत्न होताना दिसतो. मात्र, आता प्रेक्षकांचा लाडका कलाकार आदिनाथ कोठारे याने सोशल मीडियावर रक्तदान करा, असा संदेश दिला आहे. एवढेच नाही तर त्याने स्वत:ही रक्तदान केले असून रक्तदान केल्यानंतर प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राचा फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर ‘कोणत्याही चमत्काराची वाट न पाहता, रक्तदान करा.. जीव वाचवा’ अशी पोस्टदेखील त्याने अपडेट केली आहे. त्याच्या या पोस्टला सोशल मीडियावरून भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळतेय. त्याला गुड जॉब, अभिमान वाटतो तुझा अशा अनेक कमेंटदेखील मिळताना दिसत आहे. कलाकारांनी केलेल्या जनजागृतीचा नेहमीच समाजात सकारात्मकदृष्ट्या बदल होत असतो. कारण कलाकारांनी केलेली जनजागृती ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते. कारण या जनजागृतीच्या बाबतीत कलाकाराला मध्यस्थानी ठेवले तर नागरिक लवकर आकर्षित होतात. यासाठी कलाकारांनी स्वत:हून घेतलेला पुढाकारदेखील महत्त्वाचा असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणजे अदिनाथ कोठारे, असे म्हणण्यास हरकत नाही.