'आदिपुरुष' सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:56 AM2022-10-06T11:56:59+5:302022-10-06T12:00:24+5:30

प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा 'आदिपुरुष' वादात अडकला आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Adipurush controversy Bjp mla Ram kadam threatens he will not allow Saif Ali khan film to be released in maharashtra | 'आदिपुरुष' सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपाचा इशारा

'आदिपुरुष' सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपाचा इशारा

googlenewsNext

Adipurush Trolling: प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित "आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे.  चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे. यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

 भाजपचे आमदार राम कदम यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. आमदार राम कदम यांनी काही वेळेपूर्वी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलंय, आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्राच्या प्रदर्शित होऊ देणार नाही.आदिपुरुष या चित्रपटात पुन्हा एकदा, चित्रपट निर्मात्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी  देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची'.

रामकदम यांच्या आधी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रभासच्या सिनेमातील हनुमानाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. हनुमानाच्या अंगवस्त्रावरून त्यांनी निषेध केला आहे. त्यांचा दावा आहे की, या सिनेमात हनुमानाला जे अंगवस्त्र परिधान करून दाखवण्यात आले आहे ते चमड्याचे आहे. सिनेमा निर्मात्यांनी ही दृश्य काढून टाकावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Adipurush controversy Bjp mla Ram kadam threatens he will not allow Saif Ali khan film to be released in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.