Adipurush: मस्करी करतायं का...?, ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा सिनेमा पुन्हा टार्गेट झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:31 AM2023-03-30T10:31:47+5:302023-03-30T10:54:13+5:30

Adipurush New Poster: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना निर्मात्यांनी राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर पाहूनही चाहते निराश असल्याचंच चित्र आहे.

Adipurush: New poster featuring Prabhas to release on Ram Navami trolled | Adipurush: मस्करी करतायं का...?, ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा सिनेमा पुन्हा टार्गेट झाला!

Adipurush: मस्करी करतायं का...?, ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा सिनेमा पुन्हा टार्गेट झाला!

googlenewsNext

Adipurush New Poster: साऊथ सुपरस्टार प्रभास ( Prabhas ), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon ) अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘आदिपुरूष’ (Adipurush) पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. ‘तान्हाजी’ फेम दिग्दर्शक ओम राऊत हा सिनेमा दिग्दर्शित करतोय म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण गेल्या वर्षी नवरात्रीच्या मुहूर्ताला मेकर्सनी ‘आदिपुरूष’चा टीझर रिलीज केला आणि तो पाहून चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. अगदी चाहत्यांची उत्सुकता निराशेत बदलली. टीझरला जबरदस्त ट्रोल केलं गेलं. सिनेमातील रावण आणि हनुमानाचा लुक लोकांना काही केल्या पचनी पडला नाही. यातील व्हिएफएक्स सीन्सचीही प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. सिनेमातील कलाकारांची निवडच चुकली म्हणत, लोकांनी या चित्रपटाच्या मेकर्सला नको ते ऐकवलं. रामायणावर आधारित या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याची चर्चा होती. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता निर्मात्यांनी राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर पाहूनही चाहते निराश असल्याचंच चित्र आहे.

पोस्टरध्ये रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग दिसून येतोय. राम-सीता आणि लक्ष्मण यांच्यासमोर नतमस्तक झालेले हनुमानही या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहेत. मंत्रो से बढके तेरा नाम, जय श्री राम..., असं कॅप्शन देत हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टर रिलीज झालं आणि चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. अनेक युजर्सनी टीझरप्रमाणेच या पोस्टरवरही नाराजी व्यक्त केली.

नेटकरी म्हणाले...

पोस्टरमधल्या एक ना अनेक त्रुटींवर नेटकऱ्यांनी बोट ठेवलं आहे. कलाकारांची चूक नाही. त्यामुळे त्यांच्यावर राग नाही. पण हे पोस्टरसुद्धा जराही मनाला भावत नाही’, असं एकाने लिहिलं. ‘सर, हा सिनेमा रिलीज करू नका, प्रभास तू हा प्रोजेक्ट सोडून द्यायला हवास’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. लक्ष्मणाला दाढी आहे तर मग राम दाढी का ठेवू शकत नाही. प्रभास दाढीत कमाल दिसला असता, पण ओम राऊत तू सगळं मातेरं केलंस, अशी कमेंट एका युजरने केली. ‘संस्कृती मस्करी का करताय’, असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी केला. आदिपुरुषच्या पोस्टरचं एडिटिंग नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्यावरूनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. हे पोस्टर पूर्णपणे एडिटेड आहे. बॉडीच्या वर चेहरे क्रॉप करून लावले आहेत. क्रितीच्या चेहऱ्यावरची शॅडोही काढायला विसरले. खूपच खराब एडिटींग, असं एका युजरने म्हटलं. काहींनी मात्र पोस्टरचं कौतुक केलं आहे.
‘आदिपुरूष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला होता. आधी हा सिनेमा १२ जानेवारीलाच प्रदर्शित होणार होता. मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ओम राऊतच्या या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्टवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकांची ही नाराजी बघता मेकर्सनी व्हीएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. आता हा सिनेमा येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती ची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Adipurush: New poster featuring Prabhas to release on Ram Navami trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.