साऊथचा 'बाहुबली' आता प्रभूश्रीरामांच्या भूमिकेत, 'आदिपुरुष’चा फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:42 PM2022-09-30T12:42:05+5:302022-09-30T12:49:28+5:30

मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा 3D चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे.

Adipurush new poster mega teaser reveal Prabhas Adipurush in ayodhya Saif Ali Khan | साऊथचा 'बाहुबली' आता प्रभूश्रीरामांच्या भूमिकेत, 'आदिपुरुष’चा फर्स्ट लूक आऊट

साऊथचा 'बाहुबली' आता प्रभूश्रीरामांच्या भूमिकेत, 'आदिपुरुष’चा फर्स्ट लूक आऊट

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (prabhas) याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यात त्याचा आगामी 'आदिपुरुष' (adipurush) हा चित्रपट तर बहुचर्चित ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची हिच उत्सुकता लक्षात घेता अखेर प्रभासने 'आदिपुरुष' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.

प्रभासच्या मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टमध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभास धनुषसोबत दिसत आहे. एका गुडघ्यावर बसलेला अभिनेता धनुष्यात बाण घेऊन आकाशाकडे पाहतोय.  त्याचे पोस्टर सोशल मीडियावर  व्हायरल होऊ होतेय. हिंदी व्यतिरिक्त 'आदिपुरुष' तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमाची निर्मिती टी-सीरीज आणि रेट्रोफाइल्सने केली. प्रभास यात रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसेल. सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत ताजी अपडेट आहे की, या सिनेमाचं बजेट ४५० कोटी रूपये क्रॉस झालं आहे. हा सिनेमा ५०० कोटीच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. १२ जानेवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा 3D चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे.
 

Web Title: Adipurush new poster mega teaser reveal Prabhas Adipurush in ayodhya Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.