Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:54 PM2023-05-29T16:54:46+5:302023-05-29T16:55:43+5:30

रिलीजच्या अवघ्या काही तासांतच हे गाणं युट्यूबवर ट्रेंड करतेय.

Adipurush ram sita ram song released kriti sanon prabhas movie new song video | Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज

Adipurush : 'आदिपुरुष'मधील 'राम सिया राम' रिलीज होताच सोशल मीडियावर होतोय ट्रेंड, एका तासात मिळेल इतके व्ह्यूज

googlenewsNext

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे.  चित्रपटातील पहिलं गाणं जय श्री राम ऐकून चाहते भारावून गेले होते. त्यानंतर आता हे दुसरं 'राम सिया राम' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासांतच हे गाणं युट्यूबवर ट्रेंड करतेय. या गाण्याला अवघ्या 1 तासात 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

आदिपुरुषचे गाणं रिलीज झाल्यानंतरच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याच्या बोलापासून ते संगीतापर्यंत प्रेक्षकांना सगळेच खूप आवडते. गीतकार मनोज मुनताशीर यांनी लिहिले हे गाणे लोकप्रिय गायक सचेत  यांनी गायले आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा आहे. 

या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट टी-सिरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, आणि त्याचबरोबर ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश नायर यांनी निर्मित केला आहे आणि १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल.
 

Web Title: Adipurush ram sita ram song released kriti sanon prabhas movie new song video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.