Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:24 PM2022-11-15T15:24:57+5:302022-11-15T15:25:06+5:30

Adipurush Update: कलाकारांच्या लूकवरुन आदिपुरुष चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले, यानंतर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Adipurush: Saif Ali Khan's 'beard' will be gone; big decision by the makers of Adipurush regarding Ravana's look | Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

googlenewsNext

Saif Ali Khan As Ravana:प्रभास (Prabhas), कृती सेनन (kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर 'आदिपुरुष'(Adipurush) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत (Om Raut) ने केले असून, चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, टीझर समोर येताच अनेकांनी याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

कलाकारांच्या लूकमुळे वाद
भगवान राम, माता सीता, हनुमान आणि रावणाच्या लूकवरुन चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आला. यातच सर्वाधिक वाद रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खानच्या लूकमुळे झाला. सौफच्या लूकला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. टीझरमध्ये सैफला लांब दाढी वाढवलेला आणि स्टायलिश हेअर कट केलेला दाखवण्यात आला. यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी सैफचा लूक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सैफच्या लूकवर घेतलेला निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी सैफची दाढी डिजिटली काढण्याचा निर्णय घेतला आहे. VFX वापरून सैफ अली खानची दाढी कापली जाणा रआहे. सैफच्या लूकवर खूप काम करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, निर्माते वानरसेनाचा एक सीनदेखील दुरुस्त करत आहेत. हा सीन 'अॅक्वामॅन' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' सारख्या हॉलीवूड चित्रपटांमधून कॉपी केल्याचा आरोप होत आहे.

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार 
चित्रपटातील या बदलांमुळे दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष'ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. सोशल मीडियावरुन नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. ओमने लिहिले होते- 'आदिपुरुष हा चित्रपट नाही, तर प्रभू श्री रामावरील आमची भक्ती, आमच्या संस्कृती आणि इतिहासाप्रती असलेली आमची बांधिलकी आहे. प्रेक्षकांना नवा आणि अनोखा अनुभव देण्यासाठी चित्रपटावर अधिक काम करण्याची गरज आहे. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होईल. भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट आम्ही बनवत आहोत. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वाद हेच आम्हाला पुढे जाण्यास मदत करते.'

Web Title: Adipurush: Saif Ali Khan's 'beard' will be gone; big decision by the makers of Adipurush regarding Ravana's look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.