मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:19 PM2024-07-03T12:19:20+5:302024-07-03T12:19:47+5:30

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अदितीने मराठी सिनेमातही काम केलं आहे. अदितीने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

aditi rao hydari rama madhav marathi movie song shared screen with prasad oak | मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

अदिती राव हैदरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या अदिती तिच्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिरामंडी सीरिजमधील अदितीच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या वेब सीरिजमध्ये तिने बिब्बोजान ही भूमिका साकारली आहे. अदितीने बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे. 'पद्मावत', 'रॉकस्टार', 'मर्डर ३', 'बॉस', 'गर्ल ऑन द ट्रेन', 'खूबसुरत' या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना ती दिसली. तर 'अकिरा', 'डव', 'महा समुद्रम' अशा साऊथ सिनेमांमध्ये तिने जलवा दाखवला आहे. पण, तुम्हाला माहितीये का? एका मराठी सिनेमातही ती झळकली आहे. 

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अदितीने मराठी सिनेमातही काम केलं आहे. अदितीने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'रमा माधव' सिनेमात अदिती दिसली होती. या सिनेमात ती पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती. 'रमा माधव' सिनेमातील लूट लियो मोहे श्याम या गाण्यात अदिती दिसली होती. या गाण्यात तिने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली होती. 'रमा माधव' सिनेमातील हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. 

दरम्यान, 'रमा माधव' सिनेमात प्रसाद ओक रघुनाथराव पेशवे या भूमिकेत होता. या सिनेमात आलोक राजवाडे, पर्ण पेठे, रविंद्र मानकनी, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, सुचित्रा बांदेकर, अमोल कोल्हे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. मृणाल कुलकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 
 

Web Title: aditi rao hydari rama madhav marathi movie song shared screen with prasad oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.