पंचतारांकित हॉटेलमध्ये आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे होणार ग्रँड रिसेप्शन, लग्नाच्या तयारीला सुरुवात
By गीतांजली | Published: November 30, 2020 02:15 PM2020-11-30T14:15:29+5:302020-11-30T14:24:21+5:30
आदित्य 1 डिसेंबरला मंदिरात आपल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे.
आदित्य 1 डिसेंबरला मंदिरात आपल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. त्यानंतर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे लग्नाचे रिसेप्शन देणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाला कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांसह फक्त 50 लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार आदित्य नारायणचे वडील उदीत नारायण यांनी नुकत्याच एका मुलाखती दरम्यान सांगितले की, 2 डिसेंबरला मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इंडस्ट्रीचा भाग आहोत, मग आम्ही कुणाला लग्नाला कसं नाही बोलवणार.ही एक वेगळी गोष्ट आहे की कोरोना आहे आणि मोठी माणसं येऊ शकत नाहीत. पण आम्ही आपल्या बाजूने कोणताही कसर सोडलेली नाही.रिसेप्शनला अमिताभ बच्चन आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल 'बाबुल की दुल्हनिया' मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये 'शगुन' आणि 2004 मध्ये 'देखा मगर प्यार से' मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबरोबर फिल्मी जगात पाऊल ठेवले. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा शापितमध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता.