आदित्य पांचोलीवर बॉलिवूडमधील अभिनेत्रीने केले आहेत हे गंभीर आरोप, वाचून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 01:39 PM2019-07-03T13:39:27+5:302019-07-03T13:41:19+5:30

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्कार, खंडणीची तक्रार दाखल केली आहे.

“Aditya Pancholi spiked my drink and established a forceful physical relationship with me,” claims Bollywood actress | आदित्य पांचोलीवर बॉलिवूडमधील अभिनेत्रीने केले आहेत हे गंभीर आरोप, वाचून तुम्हाला बसेल धक्का

आदित्य पांचोलीवर बॉलिवूडमधील अभिनेत्रीने केले आहेत हे गंभीर आरोप, वाचून तुम्हाला बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्दे2004 ते 2006 या काळात मला वेगवेगळ्या ठिकाणावर नेऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला. तो माझ्या ड्रिंकमध्ये नेहमीच कायतरी मिसळायचा आणि माझे फोटो काढून मला ब्लॅकमेल करायचा.

आदित्य पांचोली सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्याच्याविरोधात बलात्कार, खंडणीची तक्रार दाखल केली असून या अभिनेत्रीने तक्रारीत काय नमूद केले आहे याविषयी मिड डेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अभिनेत्रीने पोलिसांना दिलेले हे स्टेटमेंट अडीज पानांचे असून आदित्य तिला ड्रग्स देऊन तिच्यावर बलात्कार करायचा असे तिने यात म्हटले आहे. 

या अभिनेत्रीने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, मी 2004 मध्ये मुंबईत अभिनेत्री बनण्यासाठी आले. त्याचदरम्यान आदित्य पांचोलीला भेटले. त्यावेळी तो 38 वर्षांचा म्हणजेच माझ्यापेक्षा जवळजवळ 22 वर्षांनी मोठा होता. मी सुरुवातीला हॉस्टेलमध्ये राहायचे, त्यावेळी त्याचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुलं होती. त्याची मुलगी तर जवळजवळ माझ्या वयाची होती. 2004 मध्ये मी एका पार्टीसाठी गेले होते. तिथे ड्रिंक घेतल्यानंतर मला अस्वस्थ वाटायला लागले. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले असल्याचे मला संशय आला होता. पण पार्टीनंतर त्याने मला घरी सोडण्याचा आग्रह केला. मी त्याच्यासोबत रेंज रोव्हर कारने गेली. पण यारी रोडला गेल्यावर त्याने गाडी मध्येच थांबवली आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी त्याने माझे फोटो देखील काढले याची थोडीदेखील कल्पना मला नव्हती. त्यानंतर आम्ही ज्यावेळी पुन्हा भेटलो, त्यावेळी आम्ही आता पती-पत्नीसारखे राहाणार असे त्याने मला सांगितले. 

मी त्याला त्यावर सांगितले होते की, तू माझ्या वडिलांच्या वयाचा असून मला माझ्या वयाच्या कोणासोबत तरी लग्न करायचे आहे. मी खूपच लहान होती आणि मुंबईत माझे कोणीच नव्हते. या गोष्टीचा त्याने फायदा घेतला. 2004 ते 2006 या काळात मला वेगवेगळ्या ठिकाणावर नेऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला. तो माझ्या ड्रिंकमध्ये नेहमीच कायतरी मिसळायचा आणि माझे फोटो काढून मला ब्लॅकमेल करायचा. एकदा मी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायला गेले होते. पण माझी रिक्षा त्याने थांबवली आणि मला बाहेर काढून मारले. मी एकदा सिनियर पोलिस ऑफिसर बिपिन बिहारीला याविषयी सांगितले होते. 

2004 ते 2005 मध्ये माझ्या एक नातलगासोबत पल्लवी अपार्टमेंटमध्ये राहात होती. घरात येऊन देखील तो माझ्यावर बलात्कार करत असे. अनेकवेळा तो मला घरात लॉक करून देखील ठेवत असे. मी कंटाळून 2006-07 मध्ये वर्सोवाला घर घेतले. त्या घराच्यादेखील त्याने ड्युप्लिकेट चाव्या बनवल्या होत्या. तो माझ्या घरात येऊन दारूच्या नशेत वस्तू तोडायचा, हंगामा करायचा. त्याच्या पत्नीला या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. पण पांचोली घरात नसताना ती खूश असते, घरात काही वेळा तरी शांती मिळते असे तिचे म्हणणे होते. 2008-09 ला मी वांद्रे येथे राहायला गेले. त्यावेळी माझी बहीण आजारी होती आणि माझ्यासोबतच राहात होती. मी चित्रीकरणासाठी गेली असता, त्याने घरी येऊन माझ्या बहिणीला देखील मारहाण केली होती. मी यावर त्याला जाब विचारला असला त्याने माझ्याकडे एक करोड रुपयांची मागणी केली होती. मी त्यातील 50 लाख दिले, तरीही त्याने मला सतावणे सोडले नव्हते. मी प्रसिद्ध अभिनेत्री झाल्यावर तर त्याने माझ्याकडे आणखी पैसे मागायला सुरुवात केली. माझे फोटो माझ्या कुटुंबियांना, घरातल्यांना, मित्रमैत्रिणींना दाखवून तुझे करियर बर्बाद करेन अशी त्याने धमकी दिली होती. 

Web Title: “Aditya Pancholi spiked my drink and established a forceful physical relationship with me,” claims Bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.