आदित्य सरपोतदारच्या सिनेमातून घडणार कोकणचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:49 PM2019-09-16T14:49:02+5:302019-09-16T15:14:01+5:30
निर्माते अजित अरोरा यांनी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच एका सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत.
"३७७ अब नॉर्मल" सारखी वेब सिरीजचे निर्माते अजित अरोरा यांनी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच एका सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करतायेत. या सिनेमाचे नाव उनाड आहे. उनाड हा चित्रपट कोकणच्या भूमीवर आधारित आहे. ज्याचे शूटिंग सध्या कोकणच्या सुंदर वातावरणमध्ये सुरु आहे. अजित अरोरा पहिल्यांदा मराठी चित्रपटात निर्मिती करणार आहेत तसेच उनाड चित्रपटात आपल्याला नवीन चेहरे सुद्धा बघायला भेटणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऑडिशन्स घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे मराठी इंडस्ट्रीतलं मोठ्ठं नाव. ‘फास्टर फेणे’, ‘उलाढाल’,‘सतरंगी रे’, रितेश देखमुखचा माऊली यासारख्या अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट दिग्दर्शन त्यांनी केलं.
युवाकेंद्रित चित्रपटांचे दिग्दर्शन, मराठी संस्कृतीची जपणूक आणि शिकवण देणारं कथानक, आशयघन चित्रपट ही वैशिष्ट्ये असलेले दिग्दर्शन म्हणून आपण त्यांना प्रामुख्याने ओळखतो.