कौतुकास्पद! 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेनं दुबईत फडकवला मराठी झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:58 PM2022-03-30T15:58:06+5:302022-03-30T16:03:36+5:30

Shreya Bugde: श्रेया बुगडेचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Admirable! 'Chala Hawa Yeu Dya' fame Shreya Bugde hoisted the Marathi flag in Dubai | कौतुकास्पद! 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेनं दुबईत फडकवला मराठी झेंडा

कौतुकास्पद! 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेनं दुबईत फडकवला मराठी झेंडा

googlenewsNext

कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) घराघरात लोकप्रिय झाली आहे. चला हवा येऊ द्या(Chala Hawa Yeu Dya)नं श्रेयाला फक्त ओळखचं मिळवून दिलेली नाही तर तिला प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. नुकतीच श्रेयाने एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे. ते म्हणजे श्रेयाने दुबईत मराठीचा झेंडा फडकवला आहे. आता तो कसा काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना...  

श्रेया बुगडे नुकतीच दुबईला 'दुबई महाराष्ट्र मंडळा'च्या एका कॉन्सर्टसाठी गेली होती. याचे काही फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेयासोबत गायिका प्रियांका बर्वे, गायक नचिकेत लेले, म्युझिशीयन धवल चांदवडकर दिसून येत आहेत. हे फोटो शेअर करत श्रेया बुगडेने कॅप्शनमध्ये, “ थँक्यू दुबई असंच नेहमी मॅजिकल राहिल्याबद्दल... काय मस्त कॉन्सर्ट होता... सर्वांसोबत स्टेज शेअर करायला मजा आली. थँक्यू ‘दुबई महाराष्ट्र मंडळ इतके प्रेम दिल्याबद्दल.... हे खूप अविस्मरणीय होते.  असे कॅप्शन तिने फोटो शेअर करून दिले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते. याशिवाय ती सोशल मीडियावर ही बरीच सक्रीय असते. स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय अनेक ट्रेंडिंग रिल्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते. 

Web Title: Admirable! 'Chala Hawa Yeu Dya' fame Shreya Bugde hoisted the Marathi flag in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.