भारतीय प्रेक्षकांनी स्वीकारली अ‍ॅडल्ट कॉमेडी

By Admin | Published: January 21, 2016 02:20 AM2016-01-21T02:20:28+5:302016-01-21T02:20:28+5:30

‘क्या कूल है हम- ३’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता तुषार कपूर, आफताब शिवदासानी, क्लौडिया सिस्ला, मंदना करमिनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Adult Comedy Indian audience accepted | भारतीय प्रेक्षकांनी स्वीकारली अ‍ॅडल्ट कॉमेडी

भारतीय प्रेक्षकांनी स्वीकारली अ‍ॅडल्ट कॉमेडी

googlenewsNext

‘क्या कूल है हम- ३’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता तुषार कपूर, आफताब शिवदासानी, क्लौडिया सिस्ला, मंदना करमिनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील संवादांची विनोदी शैली चर्चेचा विषय ठरली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तुषार कपूर व क्लौडिया सिस्ला यांनी नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली व या चित्रपटासोबतच बॉलीवूडच्या इतरही विषयावर अगदी भरभरून गप्पा केल्या. या वेळी तुषार म्हणाला, ‘पहिल्यांदाच आम्ही चित्रपटात प्रौढांचे विनोद आणले आहेत. या चित्रपटात दोन मुले असतात. काही कारणास्तव ते प्रौढांच्या व्यवसायात ढकलले जातात. अश्लील चित्रपटात काम करणारा अभिनेता एका सुसंस्कृत आणि पारंपरिक कुटुंबातील मुलीच्या प्रेमात पडतो, अशी ही स्टोरी आहे. ती प्रेक्षकांना आवडेल, असा मला विश्वास आहे. अ‍ॅडल्ट कॉमेडीला आता भारतीय प्रेक्षक अगदी मोकळ्या मनाने स्वीकारत आहेत.’
अ‍ॅडल्ट कॉमेडीबद्दल तुला काय वाटतं?
क्लौडिया : मला वाटतं, नवी पिढी ही उत्साहाने भारावलीय. ती कोणतीही गोष्ट गंभीररीत्या घेत नाही. ते चित्रपट पाहण्यासाठी अगदी सकाळी जातात, आनंद लुटतात आणि त्यांना या विषयी काहीही वेगळं अथवा लाजण्यासारखं वाटत नाही. ते सर्व जण असे विनोद सहज घेतात.
केकेएचएच - ३ मध्ये काम करण्याचा तुझा अनुभव कसा राहिला?
क्लौडिया : खरं सांगायचं झालं तर इतका आनंद मिळेल, असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. आम्ही खूप मजा केली. एकत्रित काम केले अगदी कुटुंबासारखं. कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यापाठीमागे खूप मस्ती केली.
केकेएचएच-३ आणि मस्तीजादेशिवाय, तुझ्याकडे कोणते चित्रपट आहेत?
क्लौडिया : मी कबीर कौशिकच्या ‘शिकागो जंक्शन’मध्ये काम करतेय. उत्तर प्रदेशमधील गँगवर आधारित हा चित्रपट आहे. ७० च्या दशकात उत्तर प्रदेशला ‘पूर्वेचा शिकागो’ असं म्हटलं जायचं. त्यामुळे तो काळ पाहूनच या चित्रपटाला ‘शिकागो जंक्शन’ असं नाव देण्यात आलंय. हा मनोरंजनात्मक चित्रपट आहे. सध्या मी जे काही करते आहे, त्यापेक्षा अगदी वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे.
बॉलीवूडमध्ये वादविवादाच्या गोष्टींपासून तू नेहमी कसा दूर राहिला?
तुषार : मला वाटतं मी अगदी लाजाळू आणि साधा व्यक्ती आहे. माझ्या वडिलांप्रमाणे मी कोणत्याही विवादापासून दूर राहिलो. मला असं वाटतं की, तुमचं खासगी आयुष्य तुम्ही अगदी खासगी ठेवलं, तर हे शक्य आहे. वादविवाद हे बहुदा संपर्कांनी तयार केलेले असतात आणि त्यात काही चुकीचे आहे, असं मला तरी वाटत नाही. काही लोक कामाच्या माध्यमातून बोलतात, मी अगदी तसाच आहे. मी थोडाबहुत लाजाळू आहे, बाकी काही नाही.
तुला असं वाटतं की, अश्लील विनोदांना महिलांचा विरोध होईल?
तुषार : या चित्रपटाबाबत जर कोणाला विरोध असेल तर तो पुरुषांना असू शकतो, परंतु आम्ही यापूर्वी बऱ्याच अशा भूमिका केल्या आहेत. त्यामुळे असं काही होणार नाही. ही अगदी सिच्युएशनल कॉमेडी आहे.
कृष्णाने या चित्रपटात कोणती भूमिका केली आहे?
तुषार : मी यापूर्वी कृष्णासोबत काम केलंय. कॉमेडी सर्कस आणि सध्या हा चित्रपट. त्याची काम करण्याची पद्धत ही जबरदस्त आहे. त्याचं टायमिंग अचूक असतं, तो प्रभावशाली आहे आणि चित्रीकरणादरम्यान त्याने अनेक वेळा सुधारणा केली. तो चित्रपट दिग्दर्शकासोबत संवादावर चर्चा करतो. चित्रपटातील त्याच्या उपस्थितीमुळे विनोदाची उंची वाढली. सेटवर तो अगदी धमाल उडवत असे.
साचेबद्ध भूमिकेची तुला भीती वाटत नाही?
तुषार : नाही, तुमच्यावर शिक्का बसला अथवा तुमचा ब्रँड तयार झाला, तर त्यात वाईट काय आहे? माझी एक प्रतिमा निर्माण झाली आहे, ती कदाचित बदलणार नाही. मी अनेक चित्रपटांत गँगस्टरची भूमिकाही केली आहे, तरीही माझी प्रतिमा तशीच आहे. एखाद्या दिवशी आणखी कोणीतरी येईल आणि सांगेल की मला तुझी भूमिका बदलायचीय. ‘एक व्हिलन’मध्ये रितेशच्या बाबतीत तसे घडलेच आहे.
हिंदी शिकणं अवघड आहे? तू भारताकडे कशी आकर्षित झाली?
क्लौडिया : हिंदीविषयी काहीही अवघड नाही. मी शिक्षण घेतले आणि माझ्या भाषेवर मी खूप काम केले. संपूर्ण डबिंग मीच केलं आहे.
किकू शारदाच्या विवादाबाबत तुम्ही काय सांगाल?
तुषार : माझा त्याला पाठिंबा आहे. सार्वजनिक जीवनातील लोकांविषयी ते विनोद करतील, तुम्ही त्यांना रोखू शकत नाही. सार्वजनिक व्यक्ती अशा गोष्टी टाळू शकत नाहीत. माझ्या परिवाराविषयी कोणी असं बोललं तर ते मला आवडणार नाही, त्याचप्रमाणे लोकांच्या नजरेत नसणाऱ्या गोष्टींविषयी काही बोललं, तर तेही मला आवडणार नाही. मी किकू यांना पाठिंबा देतो. कोणाला दुखावण्यासाठी विनोद नसावा. त्यांच्या कमतरतेवर आपण टीका करू नये.
तुम्ही केकेएचएच-३ मध्ये रितेशला मिस करताय?
तुषार : अफताबने ही भूमिका निभावली, याचा मला आनंद आहे. मला वाटतं अ‍ॅडल्ट कॉमेडीमध्ये रितेशने बॅकसीट घेतलीय. ‘ग्रँड मस्ती’ त्यासोबत केलेला शेवटचा चित्रपट. ज्या वेळी लोक
मला अफताबसोबत पोस्टर्सवर पाहतील, त्यावेळी त्यांना वेगळं काही जाणवेल.
‘मस्ती’, ‘क्या कूल हैं हम’ पद्धतीचा हा चित्रपट आहे. रितेशची जागा अफताबने भरून काढलीय. त्याने अनेक कॉमेडी चित्रपट आणि प्रौढ विनोदीपटात काम केलं
आहे. काही काळातच त्याच्यासोबत छान भट्टी जमली.
भारतीय प्रेक्षक आता अशा विनोदावर नाक मुरडत नाहीत. ते आता अत्यंत मुक्त आणि खुल्या दृष्टीने विचार करतात. तथापि, अश्लील विनोद आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. मग ती किटी पार्टी असो वा महाविद्यालये. बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास आपण कचरतो. दादा कोंडके यांनी भारतीय सिनेमात असे विनोद आणले आणि त्याला प्रेक्षकांनी स्वीकारलेही. शेवटी चित्रपट अश्लील आहे की कसा, हे पाहण्यासाठी लोक येत नाहीत. चित्रपटातील आशय, भाव, गाणी हे सारे चित्रपट चालण्यासाठी महत्त्वाचे भाग ठरतात. - तुषार कपूर

Web Title: Adult Comedy Indian audience accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.