'१४ व्या वर्षीच घरातल्या मोलकरणीसोबत संबंध'; पत्नीच्या 'त्या' पुस्तकामुळे हादरलेले ओम पुरी, दुसऱ्यांदा झालेला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 08:22 PM2023-05-10T20:22:15+5:302023-05-10T20:22:36+5:30

Om Puri : दमदार अभिनय आणि दमदार आवाजाने समृद्ध असलेले ओम पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे किस्से आणि आठवणी चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात.

'affair with housemaid at 14'; Om Puri, shaken by his wife's 'that' book, gets divorced for the second time | '१४ व्या वर्षीच घरातल्या मोलकरणीसोबत संबंध'; पत्नीच्या 'त्या' पुस्तकामुळे हादरलेले ओम पुरी, दुसऱ्यांदा झालेला घटस्फोट

'१४ व्या वर्षीच घरातल्या मोलकरणीसोबत संबंध'; पत्नीच्या 'त्या' पुस्तकामुळे हादरलेले ओम पुरी, दुसऱ्यांदा झालेला घटस्फोट

googlenewsNext

भारतीय सिनेइंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या वेगळ्या आवाजावरुनही ओळखले जाते. त्यातीलच एक अभिनेते म्हणजे दिवंगत ओम पुरी (Om Puri). दमदार अभिनय आणि दमदार आवाजाने समृद्ध असलेले ओम पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे किस्से आणि आठवणी चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. ओम पुरी यांनी दोन लग्न केली होती. १९९० मध्ये, त्यांनी अन्नू कपूरची बहीण सीमा कपूरसोबत लग्न केले होते. मात्र अवघ्या काही महिन्यांनंतर हे लग्न संपुष्ठात आले. यानंतर त्यांनी नंदितासोबत दुसरे लग्न केले होते.

नंदिता या व्यवसायाने पत्रकार होत्या. ओम पुरी यांनी तिच्या बुद्धिमत्तेने आकर्षित होऊन तिच्याशी लग्न केले होते. नंदिता ही त्यांच्यापेक्षा तब्बल १६ वर्षांनी लहान होती. मात्र दुर्दैवाने लग्नाच्या २६ वर्षांनंतर हे दुसरे लग्नसुद्धा तुटले होते. ओम पुरी यांचे पहिलं लग्न मोडण्यामागे नंदिताच कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मात्र तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, नंदिताच्या पुस्तकामुळे ओम पुरींच्या आयुष्यात भूकंप आला होता. त्यांची प्रतिमा प्रचंड खराब झाली होती. पुढे या पुस्तकाने दोघांनाही कायमचे वेगळे केले. कालांतराने या दोघांचा घटस्फोट झाला होता.

पुस्तक प्रकाशनानंतर दोघांच्या नात्यात आला दुरावा
ओम पुरी यांची पत्नी नंदिता पुरी यांनी त्यांची बायोग्राफी 'अनलाइकली हीरो: ओम पुरी' प्रकाशित केल्यानंतर अभिनेत्याची प्रतिमा खराब होऊ लागली होती. हे पुस्तक नंदिताने स्वतः लिहिले आहे. यामध्ये त्यांनी ओमपुरींशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. ओम पुरी यांच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचे सर्व रंजक किस्से त्यांनी अगदी जवळून सांगितले आहेत. मात्र, या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला होता आणि त्याचा शेवट खूप वेदनादायी होता. नंदिताच्या पुस्तकाने ओम पुरींचे आयुष्य बदलले होते.कारण या पुस्तकात ओम पुरींच्या विवाहबाह्य संबंधांवर बरेच काही लिहण्यात आले आहे. हे पुस्तक २००९ मध्ये प्रकशित करण्यात आले होते.

ओम पुरी अडकले वादाच्या भोवऱ्यात

नंदिताने लिहिलेल्या बायोग्राफीनुसार, ओम पुरी यांचे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांच्या घरातील मोलकरणीसोबत संबंध होते. जिचं वय ५५ होते. ओम पुरींना ती स्त्री खूप आवडत होती. ती बाई त्यांचे वडील आणि घरातील इतर लोकांची काळजी घेत होती. हे पुस्तक प्रसिद्ध होताच ओम पुरी चांगलेच वादात सापडले होते. त्यांच्या प्रतिमेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र ओम पुरी यांनी अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल बोलताना सांगितले होते की, त्यांच्या पत्नीने जाणूनबुजून त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हा कट रचला आहे.

Web Title: 'affair with housemaid at 14'; Om Puri, shaken by his wife's 'that' book, gets divorced for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.