कमल हसन आणि गौतमी यांच्यात 13 वर्षांनी दुरावा

By Admin | Published: November 1, 2016 05:05 PM2016-11-01T17:05:54+5:302016-11-01T17:05:54+5:30

गेल्या 13 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तामिळ मेगास्टार कमल हसन आणि गौतमी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे

After 13 years between Kamal Hassan and Gautami, Drava | कमल हसन आणि गौतमी यांच्यात 13 वर्षांनी दुरावा

कमल हसन आणि गौतमी यांच्यात 13 वर्षांनी दुरावा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - गेल्या 13 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तामिळ मेगास्टार कमल हसन आणि गौतमी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 13 वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये एकत्र होते. गौतमी यांनी ब्लॉगवर पोस्ट टाकून आपण विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. 
 
'गेली 13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय मला घ्यावा लागला आहे. ह्रदय तोडणारं हे सत्य स्विकारण्यासाठी आणि या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप वेळ घ्यावा लागला', असं गौतमी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. 
 
गौतमी आणि कमल हसन यांची 1989 साली चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. 2005 पासून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. विवाहसंस्थेवर आपला विश्वास नसल्याचं सांगत त्यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. गौतमी यांचं याअगोदर संदीप भाटीया या व्यवसायिकाशी लग्न झालं होतं. पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना सुब्बालक्ष्मी नावाची मुलगी देखील आहे. 
 
'माझ्या आयुष्यातील कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील अत्यंत कठीण निर्णय असून तो घेणं गरजेचं होतं. मी स्वत:ला आई म्हणून प्राथमिकता देते, आणि मुलांसाठी जे जास्त चांगलं आहे ते केलं पाहिजे. त्यासाठी आपलं मन शांत असणं गरजेचं आहे', असं गौतमी यांनी म्हटलं आहे.
 
याअगोदर श्रुती हसन आणि गौतमी यांच्यात वाद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघींमध्ये जोरदार भांडण झालं होतं, ज्यामुळे चित्रपटाचं शुटिंग थांबवावी लागली होती असं सांगण्यात आलं होतं. पण असं काही झालं नसून सर्व काही ठीक असल्याचं श्रुती हासनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं होतं. 
 

Web Title: After 13 years between Kamal Hassan and Gautami, Drava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.