25 वर्षानंतर आमीर - शाहरुख पहिल्यांदाच एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 12:31 PM2017-02-11T12:31:35+5:302017-02-11T12:37:06+5:30
बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांना एकत्र पाहायला मिळणं तसं कठीणच
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांना एकत्र पाहायला मिळणं तसं कठीणच. दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली. पण दोघांच्या मैत्रीपेक्षा शत्रुत्वाचे किस्सेच जास्त ऐकायला मिळालेत. दोघांमधील वादही अनेकवेळा समोर आले आहेत. हा वाद इतका टोकाचा आहे की, कधी ते एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पण नुकताच शाहरुखने आमीर खानसोबत सेल्फी काढून ट्विटरवर शेअर करत जे गेल्या 25 वर्षात झालं नाही ते केलं आहे.
शाहरुख खान आणि आमीर खान पीव्हीआरचे मालक अजय बिजली यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईत हजर होते. यावेळी शाहरुख खानने आमीर खानसोबत सेल्फी काढत ट्विटरवर शेअर केला आहे. 'आम्ही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो, मात्र पहिल्यांदाच सोबत फोटो काढत आहोत', असंही शाहरुखने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
शाहरुख आणि आमीरमध्ये होत असलेली मैत्री पाहून भविष्यात ते एकाच चित्रपटात दिसण्याची शक्यता चाहते व्यक्त करु लागले आहेत. आजपर्यंत दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. याऊलट ते नेहमी एकमेकांवर टीका करत असतात. पण हा सेल्फी बॉलिवूडमध्ये टर्निंग पॉईंट ठरतो का काय हे पाहावं लागेल.
Known each other for 25 years and this is the first picture we have taken together of ourselves. Was a fun night. pic.twitter.com/7aYKOFll1a— Shah Rukh Khan (@iamsrk) February 10, 2017
करण जोहरनेदेखील अजय बिजली यांच्यासोबत शाहरुख आणि आमीरने काढलेला फोटो ट्विट केला आहे.
Happy 50 Ajay!! Have the best decade ever!! It was such a fun evening!!! pic.twitter.com/zQN6MJPIjr— Karan Johar (@karanjohar) February 10, 2017