'आपण जिंकलो...'; '83' च्या यशानंतर रणवीरने आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:33 PM2021-12-24T19:33:49+5:302021-12-24T19:35:27+5:30

Ranveer singh:'83' या चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून रणवीर भारावून गेला आणि त्याने त्याच्या आईसाठी खास पोस्ट लिहिली.

after 83 film release ranveer singh posted her mother photo with cup written hum jeet gaye mumma | 'आपण जिंकलो...'; '83' च्या यशानंतर रणवीरने आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

'आपण जिंकलो...'; '83' च्या यशानंतर रणवीरने आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

googlenewsNext

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला '83' हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९८३ मध्ये भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर ’83’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन कर्णधार कपिल देव (kapil dev) यांची भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवसापासून सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कौतुक सोहळ्यामध्येच रणवीरची एक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. रणवीरने त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत या चित्रपटाचं खास प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्यात रणवीरसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी क्रिकेटपटू कपिल देव यांनीदेखील प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. हा सोहळा पार पडल्यानंतर चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून भारावलेल्या रणवीरने त्याच्या आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या हातात विजयाची ट्रॉफी असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

आईसाठी रणवीरने लिहिला खास मेसेज

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या आईने हातात ट्रॉफी धरली असून त्या छान हसत आहेत. विशेष म्हणजे '83' ला मिळत असलेलं प्रेम आणि यश याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच "आपण जिंकलो, आई.. हा खरा विजयाचा चषक आहे", असं कॅप्शन रणवीरने या फोटोला दिलं आहे.

कलाविश्वातून होतोय कौतुकाचा वर्षाव

'83'  या चित्रपटाला सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचं प्रेम मिळत आहे. कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. यात  ऋचा चड्ढा, सुनील शेट्टी, रिया चक्रवर्ती अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

रणवीर व्यतिरिक्त 'हे' कलाकार झळकले मुख्य भूमिकेत 

या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर,सुनील गावसकरांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंग यांच्या भूमिकेत एमी. विर्क, सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नींच्या भूमिकेत निशांत दहिया हे कलाकार झळकले आहेत. तसंच पंकज त्रिपाठी यांनी टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका वठवली आहे.

Web Title: after 83 film release ranveer singh posted her mother photo with cup written hum jeet gaye mumma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.